लक्ष्मीकांत बेर्डेंनी या गंभीर आजारामुळे जगाचा घेतला होता निरोप, सलमान खानलाही अश्रू झाले होते अनावर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 05:22 PM2022-12-16T17:22:19+5:302022-12-16T17:23:00+5:30

2004 साली याच दिवशी लक्ष्मीकांत बेर्डेंनी जगाचा निरोप घेतला. आज त्यांच्या निधनाला 18 वर्ष पूर्ण झाली आहेत. पण त्यांच्या रूपेरी पडदा आणि रंगमंचावरील सहज सुंदर अभिनय आजही लोकांच्या मनावर राज्य करत आहे.

Laxmikant Baird bid farewell to the world due to this serious illness, Salman Khan was also in tears. | लक्ष्मीकांत बेर्डेंनी या गंभीर आजारामुळे जगाचा घेतला होता निरोप, सलमान खानलाही अश्रू झाले होते अनावर

लक्ष्मीकांत बेर्डेंनी या गंभीर आजारामुळे जगाचा घेतला होता निरोप, सलमान खानलाही अश्रू झाले होते अनावर

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांनी मराठी तसंच हिंदी सिनेमाविश्वामध्ये सहसुंदर अभिनयानं, विनोदाच्या अचूक टायमिंगमुळे अढळ स्थान निर्माण केले होते. लोकांना पडद्यावर नेहमीच हसवणाऱ्या लक्ष्मीकांत बेर्डे यांचा शेवट खूप वेदनादायी होता. 2004 साली याच दिवशी लक्ष्मीकांत बेर्डेंनी जगाचा निरोप घेतला. आज त्यांच्या निधनाला 18 वर्ष पूर्ण झाली आहेत. पण त्यांच्या रूपेरी पडदा आणि रंगमंचावरील सहज सुंदर अभिनय आजही लोकांच्या मनावर राज्य करत आहे.

लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. त्यांचे बालपण चाळीत गेले होते. त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती आणि ते त्यांच्या शाळेतही नाटकात भाग घेत असत. याशिवाय चाळीतील गणेश महोत्सवातही तो अभिनय करत असे. त्यांचा अभिनय लोकांना आवडला आणि अनेक स्पर्धांमध्ये त्याने बक्षिसेही मिळवली होती. यानंतर त्यांनी मुंबई मराठी साथी संघ प्रॉडक्शन हाऊसमधून अभिनयाचा प्रवास सुरू केला. यात रुजू झाल्यानंतर त्याला मराठी चित्रपटांमध्ये साईड रोल मिळू लागला. पण नंतर 'टूर टूर' या मराठी चित्रपटात मुख्य अभिनेत्याची भूमिका केल्यानंतर त्यांना काम मिळू लागले आणि ते मराठीतले कॉमेडी किंग बनले.


रुपेरी पडद्याशिवाय लक्ष्मीकांत बेर्डे यांनी छोट्या पडद्यावरही आपले नशीब आजमावले, ज्यात ते यशस्वी ठरले. धूम धडाका या मराठी चित्रपटातून ते एका रात्रीत स्टार झाले. यानंतर लक्ष्मीकांत यांनी बॉलिवूडमध्ये आपला प्रवास सुरू केला. 1989 मध्ये आलेल्या मैंने प्यार किया या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर ते अनेक चित्रपटांमध्ये दिसले. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सलमान खान सोबतही चित्रपटात काम केले आहे. हम आपके है कौन, साजन यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. सलमान खान आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. 


लक्ष्मीकांत बेर्डे यांना किडनीचा विकार होता. अनेक वर्षे त्यांच्यावर उपचार सुरू होतं. मात्र मृत्यूशी झुंज लक्ष्मीकांत हरले. अभिनेत्यानं २००४ मध्ये जगाचा निरोप घेतला. लक्ष्मीकांत यांचे जेव्हा निधन झाले, तेव्हा भाईजानला प्रचंड दुःख झाले होते. जवळचा मित्र हरपल्याच्या विचारानं सलमानच्या डोळ्यात पाणी आले होते.

Web Title: Laxmikant Baird bid farewell to the world due to this serious illness, Salman Khan was also in tears.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.