Laxmikant Berde Birth Anniversary : लक्ष्या मामांचा फोन आला नि..., भरत जाधवने सांगितलेला ‘हा’ किस्सा माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 05:23 PM2022-10-26T17:23:30+5:302022-10-26T17:24:15+5:30

Laxmikant Berde Birth Anniversary : भरत जाधवने गेल्यावर्षी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जयंतीदिनी ही पोस्ट शेअर केली होती.  काय होती ती पोस्ट?

laxmikant berde birth anniversary bharat jadhav throwback post viral on social media | Laxmikant Berde Birth Anniversary : लक्ष्या मामांचा फोन आला नि..., भरत जाधवने सांगितलेला ‘हा’ किस्सा माहितीये का?

Laxmikant Berde Birth Anniversary : लक्ष्या मामांचा फोन आला नि..., भरत जाधवने सांगितलेला ‘हा’ किस्सा माहितीये का?

googlenewsNext

गेली अनेक दशके अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसविणारा अभिनेता लक्ष्या उर्फ लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांची आज जयंती आहे. 26 ऑक्टोबर 1954 साली जन्मलेल्या  लक्ष्मीकांत यांनी 16 डिसेंबर 2004 ला जगाचा निरोप घेतला. मात्र त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रत्येक रसिकाच्या मनात आजही घर करून आहेत. त्यांच्या अनेक आठवणी, त्यांचे किस्से आजही चाहत्यांना हळवं करतात. अनेक मराठी कलाकार आजही त्यांच्या आठवणीने हळवे होतात. अभिनेता भरत जाधवने (Bharat Jadhav) लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दलचा एक असाच किस्सा शेअर केला होता. लक्ष्मीकांत यांना भरत प्रेमाने ‘लक्ष्या मामा’ म्हणायचा. याच लक्ष्या मामाची एक आठवण भरतने त्याच्या पोस्टमध्ये सांगितली होती. ‘पछाडला’ हा सिनेमा केवळ लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यामुळे भरतला मिळाला होता. काय होती यामागची स्टोरी...?

भरत जाधवने गेल्यावर्षी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जयंतीदिनी ही पोस्ट शेअर केली होती.  काय होती ती पोस्ट?

भरतची पोस्ट...
लक्ष्या मामा..!
खुप आठवणी आहेत. आम्हा नवोदितांना त्यांनी ज्या प्रकारे वेलकम केल, आधार दिला... त्यांनी आपल स्टार पण आम्हाला कधी जाणवू दिलं नाही. त्यामुळेच आम्ही त्यांना मामा म्हणुन हाक मारू शकायचो.
खुप काही शिकलो त्यांच्याकडून. त्यांच्या बद्दल सांगायची सगळयात मोठी आठवण म्हणजे पछाडलेला चित्रपट. ‘सही रे सही’ जोरात सुरू होत. अशातच जानेवारी 2003 ला महेश कोठारे सरांनी पछाडलेला साठी विचारलं. आणि त्यांना लगेच काम सुरू करायचं होत. मला त्या एका वर्षात ऑगस्ट 2003 पर्यंत ‘सही’चे जास्तीत जास्त प्रयोग करायचे होते त्यामूळे मी त्यांना नकार कळवला. मध्ये काही महिने गेले आणि सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यात लक्ष्या मामांचा फोन आला की, ‘तुझं झालं का ते नाटकाचं वर्ल्ड रेकॉर्ड वगैरे... महेश ला पटकन जाऊन भेट मी तुज्यासाठी त्याला थांबवून ठेवलंय... तो पिक्चर सोडू नकोस.’ मग त्याच रात्री उशिरा महेश सरांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. आणि तिथून लक्ष्या मामांना कळवल की मी पछाडलेला करतोय. सांगायचा मुद्दा हा की, इतका मोठा माणूस... कोणालाही घेऊ शकले असते. पण त्यांनी ती एवढी मोठी संधी मला दिली. ‘पछाडलेला’ला मी त्यांचा आशीर्वाद मानतो, अशी पोस्ट भरतने शेअर केली होती. 

Web Title: laxmikant berde birth anniversary bharat jadhav throwback post viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.