‘अँड जरा हटके’ का पाहावा याची ५ कारणे जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2016 08:33 AM2016-07-21T08:33:56+5:302016-07-21T14:03:56+5:30

चित्रपटातील कलाकार आणि नवीन जोडी- ‘अँड जरा हटके’ या चित्रपटात बंगाली अभिनेता इंद्रनील सेनगुप्ता, मृणाल कुलकर्णी, शिवानी रांगोळे आणि ...

Learn the 5 reasons for looking at 'And Zara Hatke' | ‘अँड जरा हटके’ का पाहावा याची ५ कारणे जाणून घ्या

‘अँड जरा हटके’ का पाहावा याची ५ कारणे जाणून घ्या

googlenewsNext

tyle="border: 0px; font-stretch: inherit; line-height: 1.6; font-family: FontAwesome; font-size: 15px; margin-bottom: 15px; outline: 0px; padding: 0px; vertical-align: baseline; color: rgb(68, 68, 68);">चित्रपटातील कलाकार आणि नवीन जोडी-

‘अँड जरा हटके’ या चित्रपटात बंगाली अभिनेता इंद्रनील सेनगुप्ता, मृणाल कुलकर्णी, शिवानी रांगोळे आणि सिध्दार्थ मेनन हे ४ कलाकार आहेत आणि त्या चारही कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. इंद्रनील सेनगुप्ता आणि मृणाल कुलकर्णी तर शिवानी रांगोळे आणि सिध्दार्थ मेनन या दोन नवीन जोड्या या चित्रपटातून पाहायला मिळणार आहेत. या कलाकारांना दोन गुणी अभिनेत्रींची सुंदर साथ मिळणार आहे. त्या दोन अभिनेत्री म्हणजे- स्पृहा जोशी आणि सोनाली खरे.

चित्रपटाची कथा आणि हटके लव्हस्टोरी-

या चित्रपटाची कथा नक्कीच हटके असणार. बंगाली आणि महाराष्ट्रीयन अशा दोन सुंदर संस्कृतीचा मेळ या चित्रपटात घालण्यात आला आहे. बंगाली आणि मराठी ही प्रेमकथा यातील पात्रांमध्ये फुलणार आहे. बंगाली-मराठी संवाद प्रेमाच्या रुपात अनुभवयाला मिळेल.

दिग्दर्शक आणि प्रस्तुतकर्ता जोडी पुन्हा एकत्र-

प्रकाश कुंटे दिग्दर्शित कॉफी आणि बरंच काही या चित्रपटाची प्रस्तुती रवी जाधव यांनी केली आहे. ‘अँड जरा हटके’ च्या माध्यमातून ही हटके जोडी परत एकदा एकत्र आली आहे. रवी जाधव या चित्रपटाचा पण प्रस्तुतकर्ता आहे. प्रेक्षकांना या जोडीचा खुसखुशीत प्रेमकथा असलेला चित्रपट पाहायला मिळणार आहे. 

चित्रपटातील गाणी-

शैल हादा आणि हमसीका अय्यर यांच्या आवाजातील ‘सांग ना, खुणावतो काठ पुन्हा...’, शाशा तिरुपतीच्या आवाजातील ‘उमलून आले, श्वास अचानक...’ ही गाणी फारच इमोशनल आहेत. या दोन्ही गाण्यांनी माणूस भारावून जातो. तसेच या चित्रपटातील कलाकारांवर चित्रित झालेली ही गाणी नक्कीच सर्वांना भावूक करतील.

अँड जरा हटके चं हटके चित्रिकरण आणि अँगल- 

‘अँड जरा हटके’ या चित्रपटातील बारीक-सारीक गोष्टींचा, परिस्थितीचा बारकाईने विचार करुन चित्रिकरण करण्यात आले आहे.  शिवानीचा हिरमुसलेला,आनंदी चेहरा, मृणाल यांचे स्मित हास्य आणि एकाच वेळी द्विधा मनस्थिती, सिध्दार्थचा हसमुख चेहरा या सर्व कलाकारांच्या चेह-यावरील भावना योग्य टिपल्या आहेत. अँगलचा विचार केला असता एका एका सीनच्या मागे आणि गाण्याच्या मागे जो अँगल घेतला आहे तो पहायला मजा येते. ट्रेलरमध्येच आपण इतक्या गोष्टी पाहू शकतो तर संपूर्ण चित्रपट ही आपल्यासाठी मेजवाणीच ठरेल. 

Web Title: Learn the 5 reasons for looking at 'And Zara Hatke'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.