Life After Marriage: पत्नी आणि आई दोघांना एकत्र पाहतो,तेव्हा विराजस कुलकर्णीने शेअर केल्या भावना….
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 13:21 IST2022-07-18T13:17:56+5:302022-07-18T13:21:44+5:30
विराजस हा अभिनेत्री मृणाल कुलकर्णीचा मुलगा आहे. तर पत्नी शिवानी देखील उत्तम अभिनेत्री आहे. लग्नानंतर शिवानीचे सासूबाई मृणाल कुलकर्णीसह घट्ट नाते निर्माण झाले आहे. अनेकदा सासू आणि सुनेमध्ये असणारे मैत्रीचं नातं पाहायला मिळतं.

Life After Marriage: पत्नी आणि आई दोघांना एकत्र पाहतो,तेव्हा विराजस कुलकर्णीने शेअर केल्या भावना….
सेलिब्रिटी मंडळी नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. मग ते स्वतःविषयीचं एखादं कारण असो किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीबाबतची गोष्ट. ते नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असतात.‘माझा होशील ना’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता विराजस कुलकर्णीचीही सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे. सोशल मीडियावरही विराजस बराच एक्टिव्ह असून त्याचे अनेक फॉलोअर्स आहेत.
काही महिन्यांपूर्वीच विराजसने अभिनेत्री शिवानी रांगोळेसोबत लग्न करत आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे. विराजस आणि शिवानी दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे. त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते.त्याच्यातलं हे नातं लग्नानंतर अधिक घट्ट झालं आहे. सध्या तो त्याच्या खासगी आयुष्यामुळेच जास्त चर्चेत आहे. शिवानी आणि विराजस या दोघांच्या जोडीला चाहते प्रचंड पसंती देत असतात. त्यामुळे त्यांच्याशी निगडीत सगळ्याच गोष्टी जाणून घेण्यात त्यांच्या चाहत्यांनाही प्रचंड रस असतो. सध्या असाच एक किस्सा प्रचंड चर्चेत आहे.
विराजस हा अभिनेत्री मृणाल कुलकर्णीचा मुलगा आहे. तर पत्नी शिवानी देखील उत्तम अभिनेत्री आहे. लग्नानंतर शिवानीचे सासूबाई मृणाल कुलकर्णीसह घट्ट नाते निर्माण झाले आहे. अनेकदा सासू आणि सुनेमध्ये असणारे मैत्रीचं नातं पाहायला मिळतं. नुकतेच शिवानीसह मृणाल कुलकर्णी यांनी एका ब्रँडसाठी खास फोटोशूट केले. फोटोशूटमध्येही दोघांमध्ये असलेले नात्याची प्रचिती येते. इतकंच काय तर फोटोशूटमध्ये दोघांचा अंदाज आणि त्यांच्या सुंदर लूकचीही तितकेच कौतुक होत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी हे पोस्टर सध्या झळकत आहे. सध्या या पोस्टरनेच सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
यात विरासजने देखील याच पोस्टरवरुन एक एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. सोशल मीडियावर विरासजने दिलेली कॅप्शन पाहून चाहतेसुद्धा कमेंटवर कमेंट करताना दिसत आहेत.फोटोशूटमधला फोटो शेअर करत खास कॅप्शन त्याने लिहीली आहे.''हल्ली City Pride Kothrud ला गेलो की अचानक घरीच असल्यासारखं वाटतं...!''. असे त्याने म्हटलं आहे. दरम्यान त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.