ज्येष्ठ अभिनेत्री जयश्री टी राजमुद्रा यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2016 04:19 PM2016-12-15T16:19:02+5:302016-12-15T16:19:02+5:30

महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी लावणी या नृत्यावर भरभरून प्रेम केले आहे. या लवाणीवर ठुमके लावण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती तयार असतो. याच ...

Lifetime Achievement Award for Senior Actress Jayashree T. Rajamudra | ज्येष्ठ अभिनेत्री जयश्री टी राजमुद्रा यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ अभिनेत्री जयश्री टी राजमुद्रा यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

googlenewsNext
ाराष्ट्रातील प्रेक्षकांनी लावणी या नृत्यावर भरभरून प्रेम केले आहे. या लवाणीवर ठुमके लावण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती तयार असतो. याच लावणीचे कौतुक व्हावे यासाठी गेली दोन दशके लावणी क्षेत्रात दैदीप्यमान कामगिरीची दखल राजमुद्रा अकादमीने घेतली आहे. या अकादमीचा यंदाचा पुरस्कार आपल्या मादक अदा आणि थिरकायला लावणाºया दिलखेचक नृत्याने घायाळ करणाºया  आपल्या नृत्यशैलीने चाहत्यांना बेधुंद करणाºया ज्येष्ठ अभिनेत्री जयश्री टी यांची राजमुद्रा जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. जयश्री टी या आपल्या भन्नाट नृत्य आणि अभिनयशैलीमुळे फक्त मराठी चित्रपटसृष्ट्री गाजवली नाही,  तर त्यांनी त्याहीपलीकडे जाऊन हिंदीबरोबर गुजराती रंगमंच आणि सिनेविश्वही गाजवले आहेत. त्याचप्रमाणे या कार्यक्रमात लावण्यतारका सीमा पोटे-नारायणगावकर आणि चित्रपट निमार्ते मेघराज राजेभोसले यांनाही सन्मानित केले जाणार असल्याचे समजत आहे.  एकापेक्षा एक अशा लावण्यवतींच्या भन्नाट नृत्याने गेली दहा वर्षे लावणीचा धमाका सादर करणाºया गुलजार गुलछडीच्या १३०० व्या प्रयोगाची सप्तरंग उधळणही रविवारी सायंकाळी ५.३०वाजता प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरात अनुभवायला मिळेल. या प्रयोगाच्या निमित्ताने गुलजार गुलछडीचा महालावणी महोत्सवही आयोजित केला जाणार आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसा अर्थातच लावणीला जपण्यासाठी धडपडणाºया  राजमुद्राने आपला लावणी अविष्कार गुलजार गुलछडीच्या माध्यमातून रंगमंचावर आणताना दहा लावण्यवती नृत्यांगणाच्या ठसकेबाज लावण्या सादर करणार आहेत. या उधळणीत पारंपारिक लावणीसह ठसकेबाज, श्रृंगारिक, खडी आणि बैठकीच्या लावणीचे सप्तरंग लावण्यप्रेमींना एकाच मंचावर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा कार्यक्रम झक्कास असणार आहे यात शंकाच नाही.

Web Title: Lifetime Achievement Award for Senior Actress Jayashree T. Rajamudra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.