व्हायरलच्या चक्रव्यूहात फसलेल्या माणसांची कहाणी! डोकं चक्रावून टाकणारा 'लाईक आणि सबस्क्राईब'चा ट्रेलर बघाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 15:44 IST2024-10-03T15:38:14+5:302024-10-03T15:44:10+5:30
अमेय वाघ-अमृता खानविलकर यांच्या 'लाईक आणि सबस्क्राईब' सिनेमाचा भन्नाट ट्रेलर रिलीज झालाय (like ani subscribe)

व्हायरलच्या चक्रव्यूहात फसलेल्या माणसांची कहाणी! डोकं चक्रावून टाकणारा 'लाईक आणि सबस्क्राईब'चा ट्रेलर बघाच
सध्या मनोरंजन विश्वात एका चित्रपटाची खूप चर्चा आहे तो म्हणजे 'लाईक आणि सबस्क्राईब'. चित्रपटाच्या पहिव त्यामुळे यामागे काय रहस्य दडले आह, हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता लागून राहिली होती. त्यात नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरने प्रेक्षकांच्या मनात आता अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. व्हायरलच्या नादात फसलेल्या माणसांची डोकंं चक्रावणारी कहाणी सिनेमाच्या ट्रेलरमधून बघायला मिळतेय.
'लाईक आणि सबस्क्राईब'चा ट्रेलर
या चित्रपटाचा ट्रेलर अंगावर शहारा आणणारा आहे. ट्रेलरमध्ये विविध गेटअप करुन अमेय वाघ इंन्श्युरन्स आणि व्हिडीओ व्हायरल होण्यासाठी जीवाचं रान करताना दिसतोय. तर दुसरीकडे अमृता खानविलकरही पोलिसांच्या मदतीने कशाचा तरी शोध घेत आहे. त्यामुळे या सगळ्याचा परस्परांशी काही संबंध आहे का? डेड बॉडी प्रकरण काय आहे? कोणी कोणाचा खून केला? अमृता खानविलकार कोणत्या पुराव्यांच्या शोधात आहे, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला 'लाईक आणि सबस्क्राईब' चित्रपट पाहून मिळणार आहेत.
कधी रिलीज होणार 'लाईक आणि सबस्क्राईब'?
१८ ऑक्टोबरला 'लाईक आणि सबस्क्राईब' चित्रपट रिलीज होणार आहे. नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत, एस. एन. प्रॉडक्शन्स एलएलपी आणि अभिषेक मेरूकर प्रॉडक्शन्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य, अभिषेक मेरूकर निर्माते असून 'लाईक आणि सबस्क्राईब'चे लेखन आणि दिग्दर्शन अभिषेक मेरूकर यांनी केले आहे. यात अमेय वाघ, अमृता खानविलकर, जुई भागवत, शुभंकर तावडे, विठ्ठल काळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. रहस्यमयी थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांना कसा आवडणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.