LMOTY 2018 : सुमित राघवनने मारली बाजी; ‘आपला मानूस’साठी लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ने गौरव!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 01:47 PM2018-04-10T13:47:14+5:302018-04-10T20:16:44+5:30

हिंदीबरोबर मराठी सिनेमामध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारा अभिनेता सुमित राघवन ‘आपला मानूस’ या चित्रपटात अतिशय दमदार भूमिकेत बघावयास मिळाला. ...

LMOTY 2018: Sumit Raghavan has killed; 'Manashakti Maharashtrian of the year' for your mind! | LMOTY 2018 : सुमित राघवनने मारली बाजी; ‘आपला मानूस’साठी लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ने गौरव!

LMOTY 2018 : सुमित राघवनने मारली बाजी; ‘आपला मानूस’साठी लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ने गौरव!

googlenewsNext
ंदीबरोबर मराठी सिनेमामध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारा अभिनेता सुमित राघवन ‘आपला मानूस’ या चित्रपटात अतिशय दमदार भूमिकेत बघावयास मिळाला. त्याच्या याच चित्रपटातील अभिनयासाठी त्याला ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८’ या पुरस्काराने सन्मानित करण्यता आले. अमेय वाघ (फास्टर फेणे), सचिन खेडेकर (बापजन्म), प्रसाद ओक (कच्चा लिंबू-दिग्दर्शन), ललित प्रभाकर (चि. व चि. सौ. का) या तगड्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत सुमितने बाजी मारली किशोरी शहाणे यांच्या हस्ते त्याचा सन्मान करण्यात आला. 

लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इअर  पुरस्काराचे हे पाचवे पर्व आहे. राजकारण, समाजसेवा, कला, क्र ीडा, प्रशासन, उद्योग अशा विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कामिगरी करणाºया शिलेदारांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. मान्यवर परीक्षकांनी केलेले मूल्यमापन आणि वाचकांचा कौल या आधारे हा विजेता निश्चित करण्यात येतो. वरळीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये सुरू असलेल्या दिमाखदार सोहळ्यात सुमितला सन्मानित करण्यात आले.

‘आपला मानूस’ या चित्रपटात सुमित राघवनने राहुल ही भूमिका साकारली आहे. राहुलच्या वडिलांचा एक अपघात घडतो. या अपघाताची चौकशी करण्याची जबाबदारी क्र ाइम आॅफिसर नागरगोजेवर टाकली जाते. राहुल आणि त्याच्या पत्नीशी बोलून अपघाताच्या रात्री काय घडले होते, याविषयी जाणून घेण्याचा ते प्रयत्न करतात. त्या दोघांची चौकशी केल्यानंतर, राहुलच्या बाबांनी आत्महत्या केली आहे किंवा राहुल, राहुलच्या पत्नीने त्यांचा खून केला आहे, अशा तीन निकषांवर नागरगोजे पोहोचतात. त्या रात्री राहुलच्या बाबांसोबत काय घडले, याचा शोध लावत असताना बाप-मूल आणि सुनेच्या नात्यातील गुंतागुंत क्र ाइम आॅफिसर नागरगोजे यांना कळते. त्यांच्या नात्यातील असलेला कडवटपणा क्र ाइम आॅफिसर नागरगोजे कसा दूर करतो, हे या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळते. 

आजच्या पिढीला आपल्या पालकांसाठी वेळ नाहीये. उतारवयात पालकांना पैशापेक्षा आपल्या मुलाने दोन शब्द आपुलकीने बोलावे असे वाटत असते. त्यामुळे त्यांना वेळ द्या हा संदेश या चित्रपटातून देण्यात आला आहे. सुमितने या चित्रपटात रंगवलेली राहुल ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी चांगलेच कौतुक केले. त्याने त्याच्या अभिनयातून आण िदेहबोलीतून राहुल ही व्यक्तिरेखा अक्षरश: जिवंत केली आहे.

Web Title: LMOTY 2018: Sumit Raghavan has killed; 'Manashakti Maharashtrian of the year' for your mind!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.