On Location Pic:या राज्यात झाले या मराठी सिनेमाचं शूटीगं,पाच राज्यांमध्ये चित्रित केला जाणार ‘फुर्रर’!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2017 11:36 AM2017-12-20T11:36:14+5:302017-12-20T17:06:14+5:30

मराठी सिनेमा दिवसेंदिवस कात टाकतो आहे.विविध आशयघन आणि दर्जेदार कथानक असलेले सिनेमा मराठीत येत आहेत. मराठीत सिनेमा नवनवीन प्रयोग ...

On Location Pic: This movie is being shot in the state, will be featured in five states, 'Furr'! | On Location Pic:या राज्यात झाले या मराठी सिनेमाचं शूटीगं,पाच राज्यांमध्ये चित्रित केला जाणार ‘फुर्रर’!

On Location Pic:या राज्यात झाले या मराठी सिनेमाचं शूटीगं,पाच राज्यांमध्ये चित्रित केला जाणार ‘फुर्रर’!

googlenewsNext
ाठी सिनेमा दिवसेंदिवस कात टाकतो आहे.विविध आशयघन आणि दर्जेदार कथानक असलेले सिनेमा मराठीत येत आहेत. मराठीत सिनेमा नवनवीन प्रयोग केले जात आहेत. मग ते तंत्रज्ञानाच्या बाबतीत असो किंवा मग चित्रीकरण स्थळाबाबत. विविध आकर्षक लोकेशन्सवर आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मराठी सिनेमात वाढू लागला आहे.कोणत्याही दृष्टीने मराठी सिनेमा आज मागे नाही. अशीच एक आगळी वेगळी गोष्ट आगामी 'फुर्रर' या मराठी सिनेमाबाबत घडणार आहे. या सिनेमाचं शुटिंग पाच राज्यात करण्यात येणार आहे. तीस दिवसांमध्ये या सिनेमाचं शुटिंग करण्यात येणार आहे. समीर आशा पाटील याची प्रयोगशील दिग्दर्शक म्हणून ओळख आहे. नुकताच या सिनेमाचा मुहूर्त पार पडला. गुजरातच्या सापुतारा इथल्या डांग गावात या सिनेमाचं शुटिंग सुरु आहे.महाराष्ट्र, गुजरातसह राजस्थान, दिल्ली आणि उत्तराखंडमध्येही या सिनेमाचं शुटिंग करण्यात येणार आहे. फुर्रर या सिनेमाची कथा ही प्रवासावर आधारित आहे. प्रत्यक्ष प्रवासाबरोबरच या प्रवासाला मानसिक आणि भावनिक किनार असल्याचेही दिग्दर्शक समीर आशा पाटील याने सांगितले आहे. त्यामुळेच विविध लोकेशन्सवर सिनेमा शूट करण्याची संकल्पना पुढे आल्याचे त्याने म्हटले. या संकल्पनेला निर्मात्यांची ही साथ लाभल्याचं त्यांनी आवर्जून नमूद केले. निर्माते कुशल आणि अनिरुद्ध सिंग यांनी कथानकावर विश्वास ठेवून पूर्णपणे पाठिंबा देऊन हा प्रवास शक्य झाल्याचे त्याने सांगितले. या सिनेमात आजवर कधीही न पाहिलेली दृष्यं रसिकांना पाहायला मिळणार आहेत. या सिनेमात अभिनेता सयाजी शिंदे हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. मात्र त्यांच्यासोबत इतर कलाकार कोण असणार याची नावं मात्र गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहेत. याआधीही प्रयोगशील दिग्दर्शक असलेल्या समीर आशा पाटील याने चौर्य या सिनेमाच्या निमित्ताने भौगोलिक सीमा ओलांडल्या होत्या. चौर्य या सिनेमाचं शुटिंग चंबळमध्ये करण्यात आलं होतं.आता 'फुर्रर'च्या निमित्ताने एक पाऊल पुढे टाकत दिग्दर्शक समीर आशा पाटील यानं पाच राज्यात 30 दिवसांत सिनेमाचं शुटिंग पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. 

Web Title: On Location Pic: This movie is being shot in the state, will be featured in five states, 'Furr'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.