लोकमत ‘ती चा गणपतीला मराठी अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2016 10:05 AM2016-09-11T10:05:23+5:302016-09-11T16:07:26+5:30

महिला शक्तीचा सन्मान करण्यासाठी लोकमत नेहमीच आघाडीवर राहिला आहे. लोकमतच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘ती चा गणपती’ हा असाच ...

Lokmat 'Tei Ganapati Marathi actress | लोकमत ‘ती चा गणपतीला मराठी अभिनेत्री

लोकमत ‘ती चा गणपतीला मराठी अभिनेत्री

googlenewsNext
िला शक्तीचा सन्मान करण्यासाठी लोकमत नेहमीच आघाडीवर राहिला आहे. लोकमतच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘ती चा गणपती’ हा असाच एक अभिनव उपक्रम आहे. या उपक्रमाला चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेत्री भेट देत आहेत. लोकमतच्या पुरोगामित्वाच्या भूमिकेला यामाध्यमातून त्यांनी बळच दिले आहे.



अलका कुबल-आठल्ये : पी.व्ही.सिंधू, साक्षी मलिक, दीपा कर्माकर, ललिता बाबर यांनी रिओ आॅलिंपिकमध्ये खºया अर्थाने स्त्रीशक्तीचा जागर केला आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. लोकमतच्या ‘ती चा गणपती’ या उपक्रमामुळे महिलांना समाजात वेगळी प्रतिष्ठा मिळत आहे. आज खºया अर्थाने स्त्रीचा सन्मान होत आहे. 



सोनाली कुळकर्णी : प्रत्येक तरुणींच्या घरी ‘ती चा गणपती’ स्थापन झाला पाहिजे. कोणताही सण समारंभ तिच्याशिवाय अपूर्ण आहे. रिओ आॅलिंपिकमध्ये भारतीय कन्यांनी चमकदार कामगिरी करत भारताची मान उंचावली आहे. ‘लोकमत’ने ही सजावटीसाठी रिओची थीम वापरून स्त्री शक्तीला सलाम केला आहे. ‘तीचा गणपती’ला मागील 3 वर्षांपासून भेट देत असल्यामुळे हा क्षण माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे. 



स्मिता तांबे : ‘लोकमत’ने महिलांना आरतीचा मान दिला आहे त्यासाठी खरच मनापासून मी त्यांचे आभार व्यक्त करते. ‘तीचा गणपती’मुळे देखील आता बºयाच मंडळांमध्ये महिलांच्या हस्ते आरती होऊ लागेल. तेव्हा खरे परिवर्तन घडेल. ‘लोकमतच्या तीचा गणपती’ला माझ्या मनापासून शुभेच्छा. 



भार्गवी चिरमुले : स्त्रीला देवी किवा अन्य कोणत्याही रूपात पाहण्यापेक्षा सर्वप्रथम तिला माणूस म्हणून दर्जा देणे आवश्यक आहे. प्रत्येक स्त्रीला आदर, सन्मान दिला पाहिजे. आज हे काम ‘लोकमतने ती चा गणपती’ या उपक्रमाच्या माध्यमातून करून दाखविले आहे.
 

Web Title: Lokmat 'Tei Ganapati Marathi actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.