मराठी सेलिब्रेटींनीही बजावला मतदानाचा हक्क!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 10:38 AM2019-04-29T10:38:35+5:302019-04-29T10:44:56+5:30
लोकशाहीच्या या उत्सवात मराठी सेलिब्रेटीही तितक्याच उत्साहाने सहभागी झाले आहेत. मराठी सेलिब्रेटी ही मतदान करण्यासाठी सकाळपासूनच घराबाहेर पडले आहे.
लोकशाहीच्या या उत्सवात मराठी सेलिब्रेटीही तितक्याच उत्साहाने सहभागी झाले आहेत. मराठी सेलिब्रेटी ही मतदान करण्यासाठी सकाळपासूनच घराबाहेर पडले आहे. मुंबईत आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून सेलिब्रेटी मतदान केंद्रावर पोहोचताना दिसतायेत.
अभिनेता चिराग पाटीलने वडील संदीप पाटील यांच्यासोबत जाऊन मतदान केले आहे. चिराग आणि संदीप पाटील यांनी दादरच्या बालमोहन शाळेत जाऊन मतदान केलायं. चिराग पाटील याने मतदान केल्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अभिनेत्री स्पृहा जोशीने देखील मतदानचा हक्क बजावला आहे. इन्स्टाग्रामवर स्पृहाने फोटो शेअर करत लोकांना मतदान करण्याचे आवाहन केलं आहे.
अभिनेत्री तेजश्रीने डोबिंवलीमधल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यानंतर तिने इन्स्टाग्रामवर फोटोदेखील शेअर केला आहे.
अभिनेत्री जुई गडकरीने कर्जतमध्ये मतदान केलं आहे. ऐवढेच नाही तर तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना मतदान करण्यास सांगितले आहे.
अभिनेत्री विशाखा सुभेदारने देखील अंबरनाथमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.
अभिनेता सुमीत राघवनने मतदानाचा हक्क बजावला आहे आणि त्याशिवाय त्याची मुलगी दीया हिने देखील पहिल्यांदा मतदान केले आहे.
अभिनेत्री सोनाली खरे व तिचा नवरा बिजय आनंद यांनीदेखील वांद्रे येथे मतदान केले आहे.
सिम्बा चित्रपटात झळकलेली मराठी अभिनेत्री वैदेही परशुरामी हिने देखील मतदानाचा हक्क बजावला आहे.
अभिनेत्री शिल्पा तुळसकरने मतदान केले असून मतदानानंतरचा फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
अभिनेत्री पूर्वा गोखलेने मतदानाचा हक्क बजावला असून तिने तिचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि लिहिले की, आम्ही नेहमीच बोलतो की टिव्हीसमोर बसून आमच्या कार्यक्रमाची मज्जा घ्या. पण आज पहिल्यांदा मोठे काम करा. मतदान करा आणि मगच टिव्ही ऑन करा.
स्वराज्य रक्षक संभाजी मालिका फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला आहे. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करून सांगितले की, वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर माझे पहिलेच मतदान....पहिली लोकसभा निवडणूक..
अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने देखील मतदान केले आहे आणि मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
तुला पाहते रे मालिकेत विक्रांत सरंजामेच्या आई साहेब म्हणजेच अभिनेत्री विद्या करंजीकर यांनीदेखील मतदान केले आहे.
अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याने त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत म्हणाला की, माझा अधिकार, माझी जबाबदारी. व्होट करायला विसरू नका. काहीही करून.
अभिनेत्री सायली संजीवने नाशिकमध्ये जाऊन मतदान केले आहे. तिने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
अभिनेत्री मयुरी देशमुखने देखील नुकतेच मतदान केले आहे.
गायिका सावनी रविंद्र हिने मतदानाचा हक्क बजावला आहे.
अभिनेत्री मिथिला पालकरने देखील मतदान केले असून तिने देखील मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
विनोदवीर कुशल बद्रिकेने आपल्या कुटुंबियांसमवेत मतदानाचा हक्क बजावला असून त्याने त्यांचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे आणि कर्तव्य नव्हे हक्क असल्याचे सांगितले आहे.
अभिनेत्री गौरी नलावडे हिने देखील वोट केले आहे.
रात्रीस खेळ चाले मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने देखील मतदानाचा हक्क बजावला आहे.
अभिनेता भूषण प्रधानने देखील मतदान केले असून त्याने शांत राहून मतदान करण्याचे आवाहन त्याच्या चाहत्यांना केले आहे.
अभिनेता उमेश कामतने मतदानाचा हक्क बजावला आहे.
अस्मिता फेम अभिनेत्री मयुरी वाघ हिनेदेखील मतदानाचा हक्क बजावला आहे.
दिग्दर्शक व अभिनेता रवी जाधव यानेदेखील मतदान केले आहे.
माझ्या नवऱ्याची बायको फेम अभिनेता अभिजीत खांडकेकर यानेदेखील मतदानाचा हक्क बजावला आहे.
अभिनेता स्वप्नील जोशी याने मतदानाचा हक्क बजावला असून त्याने आपल्या चाहत्यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम हिनेदेखील मतदानाचा हक्क बजावला.
अभिनेता सिद्धार्थ जाधवने देखील मतदान केले आणि सोशल मीडियावर फोटो शेअर करीत म्हणाला की, माझ्याकडे पॉवर आहे, तुमच्याकडे आहे का? आज आपल्या बोटाला लागलेली शाई
जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा सन्मान करते. मी मतदान केले आहे... तुम्हीसुद्धा करा!
अभिनेता सौरभ गोखलेने पिंपरी येथे जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे.
अभिनेता आदिनाथ कोठारे व अभिनेत्री उर्मिला कोठारे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे आणि फोटो आपल्या अकाउंटवर शेअर केले आहेत.
चला हवा येऊ द्या फेम अभिनेत्री श्रेया बुगडे हिने मतदान केले आहे.
अभिनेत्री अश्विनी कासार हिने मतदानाचा हक्क बजावला आहे.
अभिनेत्री अदिती सारंगधर हिनेदेखील कल्याणमध्ये मतदान केले आहे.
'बोलक्या बाहुल्यांना' बोलते करणारे शब्दभ्रमकार रामदास व अपर्णा पाध्ये आणि त्यांचा मुलगा सत्यजीत पाध्ये यांनी मतदानाचा हक्क बजावला.
अभिनेता सुशांत शेलार याने मतदान केले.
अप्सरा फेम सोनाली कुलकर्णीनेदेखील बजावला मतदानाचा हक्क
अभिनेत्री पल्लवी पाटील हिने देखील मतदानाचा हक्क बजावला.
टाईमपास फेम प्रथमेश परब यानेदेखील मतदान केले.
अभिनेत्री हेमांगी कवीनेदेखील मतदानाचा हक्क बजावला.
मनीषा केळकर हिने मतदान केल्यानंतर व्हिडिओ शेअर केला आहे.