"लोकशाहीचा हा उत्सव साजरा करूया", मतदानानंतर सुबोध भावेचं चाहत्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 10:09 AM2024-05-13T10:09:30+5:302024-05-13T10:10:03+5:30

Loksabha Election 2024 : सुबोध भावेने पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन

loksabha election 2024 marathi actor subodh bhave casted his vote in pune | "लोकशाहीचा हा उत्सव साजरा करूया", मतदानानंतर सुबोध भावेचं चाहत्यांना आवाहन

"लोकशाहीचा हा उत्सव साजरा करूया", मतदानानंतर सुबोध भावेचं चाहत्यांना आवाहन

सध्या देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. आज राज्यात लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. अनेक सेलिब्रिटीही मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत. मराठमोळा अभिनेता सुबोध भावेने सकाळीच मतदान केंद्रावर जाऊन पत्नीसह मतदान केलं. 

मतदान केल्यानंतर सुबोध भावेने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. बोटावरील निळी शाई दाखवत सुबोधने मतदानाचं महत्त्व पटवून दिलं आहे. या पोस्टमधून सुबोध भावे आणि त्याच्या पत्नीने चाहत्यांना मतदान करण्यासाठी आवाहन केलं आहे. "लोकशाहीचा हा उत्सव साजरा करूया,मतदान करूया! आम्ही करून आलो,तुम्हीही करा! जय हिंद!", असं सुबोधने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. 

सुबोधबरोबरच आर्या आंबेकर, नेहा महाजन, श्रुती मराठे यांनीही मतदानाचा हक्क बजावला. आज राज्यात चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड या मतदारसंघात आज मतदान होणार आहे. 

Web Title: loksabha election 2024 marathi actor subodh bhave casted his vote in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.