'आज कुणीही जिंकलं असलं तरी विजय हा..'; लोकसभा निवडणूक निकालानंतर दिग्दर्शकाची सूचक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 05:53 PM2024-06-04T17:53:09+5:302024-06-04T17:54:34+5:30

आज लोकसभा निवडणूकीचा निकाल समोर येतोय. या निकालानंतर मराठी सिनेमांमधील प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक क्षितीज पटवर्धनने खास पोस्ट लिहिली आहे (kshitij patwardhan, loksabha election)

loksabha election 2024 result kshitij patwardhan said winner is democracy | 'आज कुणीही जिंकलं असलं तरी विजय हा..'; लोकसभा निवडणूक निकालानंतर दिग्दर्शकाची सूचक पोस्ट

'आज कुणीही जिंकलं असलं तरी विजय हा..'; लोकसभा निवडणूक निकालानंतर दिग्दर्शकाची सूचक पोस्ट

आज सर्वत्र लोकसभा  निवडणुकीची धामधूम आहे. अनेक राज्यांतून लोकसभेचे निकाल बाहेर येत आहेत. शनिवारी १ जूनला जो Exit पोल बाहेर आलेला त्याविरुद्ध निकाल समोर आलाय. भाजपा बहुमत मिळवेल अशी शक्यता वाटत असतानाच अनेक राज्यांमध्ये भाजपाला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. निवडणूक निकालानंतप विविध सेलिब्रिटींच्या पोस्ट समोर येत आहेत. अशातच मराठमोळा लेखक-दिग्दर्शक क्षितीज पटवर्धनने मोजक्याच शब्दात सूचक पोस्ट लिहिली आहे.

क्षितीज पटवर्धनची पोस्ट चर्चेत

क्षितीज पटवर्धनने पोस्ट लिहिली आहे. यात तो म्हणतो, "आज कुणीही जिंकलं असलं तरीही विजय हा लोकशाहीचा झालाय." अशी मोजक्या शब्दात सूचक पोस्ट क्षितीजने लिहिली आहे. "कुणाचाही धुरळा उडू द्या, पण महाराष्ट्राची धूळधाण होऊ देऊ नका", "मुंबईत मराठी माणूस जिंकला" अशा कमेंट करत अनेकांनी क्षितीजला समर्थन दिलंय. याशिवाय क्षितीजच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.

महाराष्ट्राच्या निवडणूक निकालाचे अपडेट्स

महाराष्ट्रातील ४८ जागांसह देशातील ५४३ जागांचा निकाल आता हळूहळू स्पष्ट होऊ लागला आहे. त्यात राज्यातील ४८ जागांवर महायुतीला जबरदस्त फटका बसला आहे. मिशन ४५ चं स्वप्न बघणाऱ्या महायुतीला राज्यात २० जागाही मिळणं अवघड झालं आहे. महाराष्ट्रात काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारली आहे. राज्यात १७ जागा लढवणाऱ्या काँग्रेसला ११ ते १२ जागांवर आघाडी आहे. अशाप्रकारे अपेक्षेपेक्षा वेगळा निकाल यावेळी बघायला मिळालाय.

     

    Web Title: loksabha election 2024 result kshitij patwardhan said winner is democracy

    Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.