हे पाहा... कुठे फिरते ही अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2016 12:55 PM2016-12-13T12:55:12+5:302016-12-13T12:55:12+5:30

प्रत्येक कलाकाराचे जीवन लाइट, अ‍ॅक्शन, कॅमेरा, टेक, रिटेक यामध्ये अडकलेले असते. या चंदेरी दुनियेतून कुठेतरी निवांतपणा मिळावा यासाठी कलाकार ...

Look ... where the actress turns | हे पाहा... कुठे फिरते ही अभिनेत्री

हे पाहा... कुठे फिरते ही अभिनेत्री

googlenewsNext
रत्येक कलाकाराचे जीवन लाइट, अ‍ॅक्शन, कॅमेरा, टेक, रिटेक यामध्ये अडकलेले असते. या चंदेरी दुनियेतून कुठेतरी निवांतपणा मिळावा यासाठी कलाकार हॉलिडे प्लॅनिंगचा विचार करत असतात. आता हेच पाहा ना, अभिनेत्री सखी गोखले हिनेखील तिच्या थायलँड ट्रीपचे काही फोटो सोशलमीडियावर अपलोड केले आहेत. म्हणजेच सखीने मालिका, नाटक, चित्रपटाच्या सततच्या शेडयुल्डनंतर मस्तपैकी एक ट्रीप केली असल्याचे पाहायला मिळत आहे. या फोटोंमध्ये तिच्यासोबत काही मैत्रिणीदेखील पाहायला मिळत आहेत. समुद्रकिनारीची भटकंती, जलप्रवास त्याचप्रमाणे थायलँडच्या निसर्गरम्य भागात काढलेले झक्कास फोटो आणि सेल्फी हे देखील तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरले असल्याचे दिसत आहे. तिच्या या फोटोंना सोशलमीडियावर भरभरून लाइक्स मिळाले आहेत. त्याचप्रमाणे तिला अप्रतिम कमेंन्टसदेखील मिळाल्या आहेत. सखीचे अमर फोटो स्टुडिओ हे नाटक सध्या चर्चेत आहेत. या नाटकमध्ये तिच्यासोबत सुव्रत जोशी, अमेय वाघ, पूजा ठोंबरे पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे या नाटकाचे निर्माते अभिनेता सुनिल बर्वे आहेत. सध्या या नाटकाच्या प्रयोगावर नोटाबंदीचा परिणाम होऊ नये. म्हणून या नाटकाचे तिकीट चेक, डेबिट कार्ड, पेटीएम, आॅनलाईन बुकिंगने स्वीकारले जातात. त्यामुळे या नाटकाची चर्चा सध्या रंगू लागली आहे. त्याचप्रमाणे तिने अभिनेता सिध्दार्थ चांदेकरसोबत एका चित्रपटाचे चित्रिकरणदेखील पूर्ण केले आहे. या चित्रपटाचे काही चित्रिकरण कोकणात झाले असल्याचे समजत आहे. मात्र अदयाप या चित्रपटाचे नाव काय असणार आहे हे गुलदस्त्यात आहे. त्यामुळे सखीच्या या नवीन चित्रपटाची  उत्सुकतादेखील प्रेक्षकांना लागली आहे. 









्र



 

Web Title: Look ... where the actress turns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.