मोकळे केस, नाकात नथ अन् जरतारीची साडी, सोनाली कुलकर्णीच्या मराठमोळ्या लूकला मिळतेय पसंती!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 07:00 AM2021-07-26T07:00:00+5:302021-07-26T07:00:00+5:30
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने मराठमोळ्या अंदाजातील फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. ती सोशल मीडियावर एक्टिव्ह असून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. बऱ्याचदा ती ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. तर ती फिटनेसच्या बाबतीत जागरूक असून व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते. मात्र यावेळी तिने मराठमोळ्या अंदाजातील फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सोनाली कुलकर्णी हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की,रोज़ शाम आती थी, मगर ऐसी ना थी, रोज़ रोज़ घटा छाँती थी, मगर ऐसी ना थी.
या फोटोत सोनालीने जरतारीची साडी नेसली असून नाकात नथ आणि केस मोकळे ठेवले आहेत. या फोटोत ती खूपच सुंदर दिसते आहे. तिच्या या फोटोला चाहत्यांचीच नाही तर मराठी कलाकारांचीदेखील पसंती मिळत आहे. चाहत्यांसोबत कलाकारांनीदेखील या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने ७ मे रोजी फियॉन्से कुणाल बेनोडेकरसोबत दुबईत लग्न केले. लग्नानंतर ती दुबईतच असते. नुकतीच ती भारतात परतली आहे.
तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचे तर ती छत्रपती ताराराणी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या मोशन पोस्टरला खूप पसंती मिळाली होती. याशिवाय फ्रेश लाइम सोडा सिनेमात ती प्रार्थना बेहरेसोबत झळकणार आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रार्थनाचा नवरा अभिषेक जावकर करणार आहे. तसेच तिचा झिम्मा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.