‘फॉरेणची मेम’ मराठीच्या प्रेमात, क्लाऊडिया सिसेलियाला करायचं मराठी सिनेमात काम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 08:00 AM2018-12-25T08:00:00+5:302018-12-25T08:00:00+5:30
एकाच पठडीतील भूमिका साकारण्यात रस नसून आव्हानात्मक भूमिका करायला आवडतात असंही क्लाऊडियाने आवर्जून सांगितले आहे.
चित्रपटसृष्टीत अनेक परदेशी कलाकार पाहायला मिळतात. मग ते सिनेमातील एखादी छोटी भूमिका असो किंवा मग आयटम नंबर. परदेशी कलाकारांनी चित्रपटसृष्टीत आपली छाप सोडल्याचे दिसून येतं. अशाच परदेशी कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री क्लाऊडिया सिसेलिया.बिग बॉस या रियालिटी शोमधून पुढे आलेल्या क्लाऊडियाने विविध हिंदी आणि काही प्रादेशिक भाषांमधील सिनेमात आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.
'क्या कूल है हम-३', 'खिलाडी ७८६' या आणि अशा विविध हिंदी सिनेमांमध्ये या पोलंड-जर्मनच्या अभिनेत्रीने काम केले आहे. आता क्लाऊडियाला मराठी सिनेमात काम करायचे आहे. क्लाऊडिया भारतीय भाषांवर विशेष प्रेम आहे. पंजाबी, बंगाली आणि मल्याळम भाषेच्या सिनेमात क्लाऊडियाने काम केले आहे. हा अनुभव जबरदस्त होता आणि नव्या भाषा शिकायला मिळणं याहून आनंदाची दुसरी गोष्ट नाही असं क्लाऊडियाने सांगितले आहे.
आता क्लाऊडियाला मराठी सिनेमांनी भुरळ घातली आहे. तिला आता मराठी सिनेमात काम करायचे आहे. मराठी सिनेमाचा भाग व्हायला आवडेल असं तिने सांगितले आहे. सिनेमात चांगल्या संधी मिळाव्यात यासाठी अभिनय कौशल्य आणि नृत्य यावर विशेष मेहनत घेत असल्याचे क्लाऊडियाने म्हटले आहे. दिवसेंदिवस मराठी सिनेमा भरारी घेत असून या यशस्वी चित्रपटसृष्टीचा भाग व्हायला आवडेल असंही क्लाऊडियाने नमूद केले आहे. एकाच पठडीतील भूमिका साकारण्यात रस नसून आव्हानात्मक भूमिका करायला आवडतात असंही क्लाऊडियाने आवर्जून सांगितले आहे.
मराठीत काम करणा-या क्लाऊडियाहीच फॉरेनर अभिनेत्री नसून अनेक फॉरेनर एक्ट्रेस या मराठी सिनेमात झलकल्या आहेत.मराठी भाषेचा कोणताही गंध नसताना रशियन बिलीयाना रॉडोनिचनं मराठमोळी सून साकारली... ही फॉरेणची पाटलीण भलताच भाव खावून गेली.गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा सिनेमाचा विषय तर खरा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या अवतीभवती फिरणारा... मात्र यांतली सुझान बर्नेट मराठी गावरान रंगात न्हाऊन गेली होती..अशीच काहीशी परदेशी जादू पिपाणी सिनेमातही पाहायला मिळाली... जर्मन अभिनेत्री क्रिस्टिनच्या अभिनयानं सिनेमाला चारचाँद लावले...या फॉरेनर अर्थात परदेशी पाहुण्यांचा जलवा पाहून मराठी सिनेमांचं पाऊल पडते पुढे असं म्हटल्यास वावगं ठरु नये...