मराठीत काम करायला आवडते
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2016 07:54 AM2016-05-27T07:54:09+5:302016-05-27T13:24:09+5:30
सलाम-ए - इश्क, गोलमाल रिटर्न, सनडे, शानदार यासारख्या हिंदी सिनेमांमध्ये आपल्या अभिनययाची झलक दाखविल्यानंतर अंजना ...
सलाम-ए - इश्क, गोलमाल रिटर्न, सनडे, शानदार यासारख्या हिंदी सिनेमांमध्ये आपल्या अभिनययाची झलक दाखविल्यानंतर अंजना सुखानी आता मराठी इंडस्ट्रीमध्ये लाल इश्कच्या माध्यामातून पाऊल ठेवीत आहे. पहिलाच मराठी चित्रपट अन तोही संजय लीला भन्साली यांचा, याबद्दल ती चांगलीच खुष आहे. लाल इश्क चित्रपटातील तिच्या एन्ट्रीपासुन ते एकंदरीतच या सिनेमाच्या प्रवासाबद्दल अंजनाने सीएनएक्ससोबत मस्त गप्पा मारल्या....
लाल इश्क मध्ये तुझी एन्ट्री कशी झाली.
- : मला संजय लीला भन्साली यांच्या आॅफीस मधुन फोन आला. त्यांनी सांगितले आम्ही मराठी फिल्म बनवतोय त्यातील एका रोलसाठी तु काम करशील का. मग मी गेले तिथे मला स्वप्ना ताईने स्क्रीप्ट दिली वाचायला अन मी ते डायलॉग्ज म्हटले अन अशाप्रकारे मी लाल इश्क ची हिरोईन झाले.
संजय लीला भन्साली यांच्या चित्रपटात काम करण्याचा तुझा अनुभव कसा होता.
-: माझा अनुभव एकदमच मस्त होता. भन्साली यांच्या चित्रपटातील भव्य-दिव्यता जशी आपण पाहतो अगदी तसेच सेट्स यामध्ये होते. हा एक रोमँटिक थ्रिलर आहे. मी पहिल्यांदाच अशा प्रकारचा चित्रपट करीत होते. संजय लीला भन्साली,शबिना खान,स्वप्ना वाघमारे,स्वप्निल जोशी यांच्या सोबत काम करणे म्हणजे माझ्यासाठी खरी सुवर्ण संधी होती.
तुझा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे तर यासाठी तु मराठी शिकली आहेस का
-: चित्रपटाचे शुटिंग सुरु होण्यापुर्वी १५ दिवस आधी आम्ही वर्कशॉप घेतले होते. यामध्ये स्क्रीप्ट रिडींग, डायलॉग्ज आमचे उच्चार या सर्व गोष्टींवर भर देण्यात आला. अन त्या दरम्यानच मी कम्फर्टेबल झाले. मला माझे डायलॉग्ज बोलताना काहीच अडचणी आल्या नाहीत. सेटवर सर्वजण मला समजुन घ्यायचे. काही चुकले तर मला सांगायचे, सगळ््यांनीच मला मदत केली. आजही जर इंटर्व्ह्यु देताना मी अडखळले तर स्वप्निल मला सांभाळून घेतो.
लाल इश्कचे प्रोमो पाहिल्यानंतर बॉलीवुडमधील तुझ्या फ्रेन्ड्सची काय रिअॅक्शन होती.
-: सगळ््यांनीच माझ्या कामाचे भरभरुन कौतुक केले. चांद मातला हे गाणे पाहताना ते हिंदी चित्रपटातीलच आहे असे वाटते अशी रिअॅक्शन बºयाच जणांची होती. त्या गाण्यातील माझा परफॉरमन्स पाहुन आशुतोष गोवारीकर, विकास बेहल, रमेश तोरानी अन बºयाच माझ्या फ्रेन्ड्सनी मला मेसेज केले.
बॉलीवुड व्यतीरिक्त तु अनेक फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केले आहेस, मग मराठीत काम करताना तुला काय वेगळेपण जाणवले.
-: हो, हे खरे आहे मी तेलगु, तामिळ, कन्नड, पंजाबी, हिंदी अन आता मराठी अशा पाच भाषांमध्ये काम केले आहे. प्रत्येक ठिकाणचा अनुभव हा नक्कीच वेगळा असतो. तुम्ही तेलगु सिनेमा पाहिला तर त्यांची एक वेगळीच खासियत आहे. तेलगु चित्रपट हा लाऊड असतो. तर आपला बॉलीवुडचा सिनेमा अगदी कमर्शिअल अन रोमँटिक आहे. मराठी बद्दल विचाराल तर मराठी चित्रपट हा रिअल सिनेमा आहे.
सेटवर तुझ्यासोबत काही प्रॅन्क करण्यात आला का
-: आम्ही सगळ््यांनी खरच सेटवर खुप धमाल मस्ती केलीय. मला मराठी बोलता येते पण जास्त समजत नाही. मग स्वप्निलने मला मजेत काही शिव्या शकविल्या अन तो सांगायचा याचा अर्थ आहे गुड मॉर्निंग, मग मी सेटवर जाऊन सगळ््यांना डुचक्या, भकराड असे म्हणायचे पण ती लोक माझ्याकडे रागाने पहायचे मला कोणीच काही रिप्लाय देत नसे. मग स्वप्निलने सगळ््यांना सांगितले तीला मीच हे म्हणायला शिकविले आहे.
मराठी चित्रपटांच्या पुढे आॅफर्स आल्या तर काम करशील का
-: हो, नक्कीच करीन, इनफॅक्ट मला मराठी सिनेमात काम करायला आवडेल. असे नाही की मी एक चित्रपट केला अन मग टाटा बाय बाय. मी सैराट, फॅन्ड्री, डॉ. प्रकाश बाबा आमटे हे चित्रपट पाहिले आहेत. मला ते खुपच आवडले. आज मराठी सिनेमात वेगळे विषय येतात, त्यामुळे मी नक्कीच मराठी सिनेमा करीन.