'लव यु जिंदगी' आजपासून चित्रपटगृहात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 07:15 AM2019-01-11T07:15:00+5:302019-01-11T07:15:00+5:30
या चित्रपटातून हाच संदेश जातो. एक सकारात्मक, टवटवीत विषयावरील चित्रपट मनाला आनंद देऊन जातो. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन मनोज सावंत यांचं आहे
लव यु जिंदगी' हा प्रेमाची गोष्ट सांगणारा चित्रपट आहे. प्रेमाची व्याख्या वयाच्या तरुण, प्रौढ, ज्येष्ठ अशा तीन टप्प्यात बदलत असते. कितीही वय झाले तरी माणसाने आनंदी राहणे, छंद जोपासणे सोडू नये. आयुष्यात प्रेमाबरोबरच प्रत्येक क्षणाचा आनंद मिळवण्याचा प्रयत्न करावा. अशा आयुष्यावर शतदा प्रेम करावे असे मत लव यु जिंदगीच्या कलाकारांनी लोकमतशी बोलताना व्यक केले. यावेळी अभिनेते सचिन पिळगावकर, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, आदी उपस्थित होते.
लव यु जिंदगी मध्ये अभिनेते सचिन पिळगांवकर यांची प्रमुख भूमिका आहे आणि त्यांच्या सोबतीला अभिनेत्री कविता लाड आणि प्रार्थना बेहरे देखील महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. याचित्रपटाच्या निमित्ताने हे तिघेही पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. या चित्रपटाच्या नवीन पोस्टरमध्ये त्यांचा नवा लूक आपण पाहू शकतो. तसेच कविता लाड आणि सचिन पिळगांवकर यांची जोडी प्रेक्षकांना पहिल्यांदाच अनुभवयाला मिळणार आहे. इतकंच नव्हे तर कविता लाड आणि प्रार्थना बेहरे देखील पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. अशावेळी जिंदादील व्यक्ती असलेल्या अनिरुद्ध दातेचीही उडणारी तारांबळ ही गंमतीदार झालीये.
या चित्रपटातून हाच संदेश जातो. एक सकारात्मक, टवटवीत विषयावरील चित्रपट मनाला आनंद देऊन जातो. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन मनोज सावंत यांचं आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा प्रथम चित्रपट आहे. चित्रपटाची निर्मिती एस. पी. प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड आणि एस. पी. एंटरप्राइजेज यांनी प्रस्तुती केली आहे. चित्रपटाचे निमार्ते सचिन बामगुडे यांनी चित्रपटाची ही दुहेरी बाजू समर्थपणे सांभाळली आहे.
चित्रपटात अनिरुद्ध दाते यांची भूमिका सचिन पिळगावकर यांनी केली आहे. त्यांच्याशिवाय आणखी कोण या भूमिकेला न्याय देऊ शकणार! अनिरुद्ध दातेच्या बायकोच्या भूमिकेत कविता लाड मेढेकर आहेत. त्यांनी आपल्या भूमिकेला सुरेख न्याय दिलाय. प्रार्थना बेहरेला ह्यरियाह्णच्या टवटवीत भूमिकेत बघताना छान वाटतं. याशिवाय अतुल परचुरे आणि समीर चौघुले यांनी नेहमीप्रमाणे आपल्या सहज अभिनयाने आपापल्या भूमिकेला सजवलं आहे. चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन समीर सापतिस्कर यांनी केलंय. चित्रपटाला साजेसं छायाचित्रण पराग देशमुख यांचं आहे. पार्श्वगायनाची धुरा अवधूत गुप्ते आणि सचिन पिळगावकर यांनी सांभाळली आहे. लव यु जिंदगी चित्रपटाची पटकथा श्रीपाद जोशी आणि मनोज सावंत तर संवाद गणेश पंडित आणि श्रीपाद जोशी यांनी लिहिले आहेत. सचिन पिळगावकर, कविता लाड मेढेकर आणि प्रार्थना बेहरे यांची प्रमुख भूमिका असलेला, सकारात्मक, कौटुंबिक मनोरंजक लव यु जिंदगी आज महाराष्ट्रभर प्रदर्शित होतोय.
सचिन पिळगावकर म्हणाले, वयानुसार आयुष्य जगण्याबाबत समाजाने घालून दिलेल्या स्टिरिओटाईप्स मापदंडांंना उधळून लावणारा हा अनिरुद्ध दाते वाटतो. हा सिनेमा सकारात्मक संदेश देणारा, मनाला स्पर्श करणारा आहे. वय झालं म्हणून व्यक्तीने आनंदी राहायला फक्त समाजाच्या दृष्टीने वयाला साजेशेच काम किंवा छंद बाळगण्याची गरज नसते, वय फक्त शरीराच्या वयाचा आकडा असतो ते मनाच्या व्यापकतेचे परिमाण नसतं. मनाचा तजेला, आनंद, जिंदादिली हे वयानुरूप येणाऱ्या तथापि लादल्या जाणाºया बाह्य बाबींवर अवलंबून नसते, नसावे, हेच हा मी सांगतो. अनिरुद्ध आणि रिया यांच्यात मैत्री होते. त्यांची मैत्री अनिरुद्ध दातेच्या आयुष्याला वेगळी आशा आणि दिशा देते, सकारत्मकतेने आयुष्याकडे बघायला सांगते. अनिरुद्ध दातेंमधील उत्साहाच्या, आनंदाच्या पाईपलाईनमध्ये अडकलेला गोळा निघतो आणि त्यांच्या आयुष्यात चैतन्याचा प्रवाह वाहू लागतो. ते नव्याने पुन्हा जोमात आयुष्य जगण्याचा निर्णय घेतात. पण समाजाने आखून दिलेल्या ठराविक मापदंडांना नाकारणाऱ्या, स्वत:चं आयुष्य स्वत:च्या अटींवर जगणाº्याला अडचणींचा सामनाही कधीतरी मग करावाच लागतो.
प्रार्थना बेहेरे म्हणाली, लव यु जिंदगी हा चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला आपल्या जीवनातील चांगल्या किंवा वाईट गोष्टींची आठवण करून देतो. या चित्रपटात सचिनजीनी अनिरुद्ध दाते ची उत्तम भूमिका केला आहे. त्या निरुत्साही आयुष्याकडून उत्साही जीवनाकडील वाटचाल सकारत्मक जीवन जगण्याची सांगड घालून देते. सचिन पिळगावकर यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव फारच छान होता. जेव्हा मला या चित्रपटात काम करणार आहात का? असे विचारले तेव्हा मी सचिनजी आहेत म्हणजे नक्कीच करणार असे ठरवले. अशा मोठया व अनुभवी कलाकाराबरोबर काम करण्याची संधी मिळाली याचा मला अभिमान आहे.