B'day Special:आलिशान फार्महाऊस आणि महागड्या गाड्यांसह ७२ कोटींचे मालक असूनही, नाना पाटेकर जगतात साधे पद्धतीने जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 10:11 PM2018-10-08T22:11:56+5:302019-01-01T12:35:14+5:30

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात सरसावणाऱ्या आणि त्यांच्यात सामान्यांप्रमाणे मिसळणाऱ्या नाना पाटेकर यांनी त्यांच्या कमाईतील ९० टक्के रक्कम समाजसेवेसाठी खर्च केली आहे.

Luxurious Farmhouse, Expensive Cars And Owns 72 Crores Property,But Nana Patekar Living Simple Life Normally | B'day Special:आलिशान फार्महाऊस आणि महागड्या गाड्यांसह ७२ कोटींचे मालक असूनही, नाना पाटेकर जगतात साधे पद्धतीने जीवन

B'day Special:आलिशान फार्महाऊस आणि महागड्या गाड्यांसह ७२ कोटींचे मालक असूनही, नाना पाटेकर जगतात साधे पद्धतीने जीवन

googlenewsNext

अभिनेत्री तनुश्री दत्ताने मराठमोळे अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर छेडछाड आणि गैरवर्तन केल्याचा आरोप केलेत. गेल्या दशकांहून अधिक काळ चित्रपटसृष्टी गाजवणारे नाना पाटेकर तनुश्रीच्या या आरोपांमुळे वादात सापडले. आपला दमदार अभिनयाने रसिकांची मने जिंकणाऱ्या आणि एक उत्तम माणूस असणाऱ्या नाना यांच्यावरील या आरोपांमुळे साऱ्यांनाच धक्का बसला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात सरसावणाऱ्या आणि त्यांच्यात सामान्यांप्रमाणे मिसळणाऱ्या नाना पाटेकर यांनी त्यांच्या कमाईतील ९० टक्के रक्कम समाजसेवेसाठी खर्च केली आहे. त्यामुळे तनुश्रीने केलेल्या आरोपानंतर अनेकांना विशेषतः नाना यांच्या फॅन्सना यांत तथ्य वाटत नाही.

एका संकेतस्थळाच्या माहितीनुसार नाना यांच्या नावे ७२ कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. यांत फार्महाऊस, कार आणि इतर कोट्यवधीच्या संपत्तीचा समावेश आहे. असं असूनही नाना पाटेकर यांच्या राहणीमान, वागणं यातील साधेपणा कायम आहे. नाना सामान्य आयुष्य जगणे पसंत करतात. नाना पाटेकर यांचा पुण्याच्या खडकवासलामध्ये २५ एकरांमध्ये पसरलेले शानदार फार्महाऊस आहे. शहराच्या गर्दीपासून दूर जेव्हा निवांत श्वास घ्यायचा असतो त्यावेळी नाना तिथं जातात. दिग्दर्शक संगीत सिवान यांच्या २००८ मध्ये आलेल्या 'एक : द पावर ऑफ वन' सिनेमाचं चित्रीकरणही नानाच्या याच फार्महाऊसवर झालं होतं.

या ठिकाणी नाना धान्य, गहू आणि हरभऱ्याचीही शेती करतात. घराजवळ अनेक प्रकारची झाडं-झुडपंही लावली आहेत. शिवाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गायी-म्हशी आहेत. सात खोल्यांच्या या फार्महाऊसमध्ये एक मोठा हॉल आहे. फर्निचर आणि टेराकोटा फ्लोरने नाना यांचं हे फार्महाऊस सजलं आहे. याशिवाय नाना यांच्याकडे ८१ लाख रुपयांची ऑडी-Q7 कार आहे. तसंच १० लाखांची महिंद्रा स्कॉर्पियो आणि दीड लाख रु. किंमतीची रॉयल इनफिल्ड क्लासिक-३५० आहे. प्रत्येक व्यक्तीने त्याच्या गरजेनुसारच खर्च करायला हवा अशी नाना यांची धारणा आहे. 

त्यामुळेच आलिशान जीवन न जगता अत्यंत साधेपणाने आपल्या आईसोबत राहतात. नाना त्यांच्या आईंसोबत ७२० चौ. फुटाच्या वन बीएचके फ्लॅटमध्ये वास्तव्याला आहेत. ९०च्या दशकात त्यांनी हा फ्लॅट केवळ १.१ लाखात खरेदी केला होता. नाना आवड म्हणून नाही तर परिस्थितीमुळे अभिनय क्षेत्रात आले. याच कारणामुळे ते आज साधारण आयुष्य जगतात. सिनेमात येण्यापूर्वी नाना रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग रंगवण्याचे काम करायचे. ते अप्लाइड आर्टमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. ते एक उत्कृष्ट स्केच आर्टिस्ट आहेत. मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी ते आरोपींचे स्केच बनवण्याचे काम करायचे. शिवाय प्रहार सिनेमातील भूमिकेसाठी नाना यांनी ३ वर्षे लष्काराचे प्रशिक्षणही घेतलं होतं.

Web Title: Luxurious Farmhouse, Expensive Cars And Owns 72 Crores Property,But Nana Patekar Living Simple Life Normally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.