'एलिझाबेथ एकादशी' म्हणजे मधुगंधाचीच कहाणी! पोस्ट शेअर करत म्हणाली, "मी आणि भावाने..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 01:44 PM2024-11-15T13:44:50+5:302024-11-15T13:46:22+5:30

मधुगंधाने जाग्या केल्या पंढरपुरच्या आठवणी

madhugandha kulkarni shares post about elizabeth ekadashi movie making and her childhood connection | 'एलिझाबेथ एकादशी' म्हणजे मधुगंधाचीच कहाणी! पोस्ट शेअर करत म्हणाली, "मी आणि भावाने..."

'एलिझाबेथ एकादशी' म्हणजे मधुगंधाचीच कहाणी! पोस्ट शेअर करत म्हणाली, "मी आणि भावाने..."

परेश मोकाशी (Paresh Mokashi) आणि मधुगंधा कुलकर्णी (Madhugandha Kulkarni) ही एकापेक्षा एक चांगले मराठी सिनेमे देणारी जोडी. परेश मोकाशी  उत्तम दिग्दर्शक आहेत तर मधुगंधा उत्तम लेखिका. 'एलिझाबेथ एकादशी' ते 'वाळवी', 'नाच गं घुमा' अशा सिनेमांनी त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली.  नुकताच त्यांच्या 'वाळवी' या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याच प्रवासाबद्दल लेखिका, अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णीने सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट शेअर केली आहे.

१४ नोव्हेंबर २०१४ रोजी 'एलिझाबेथ एकादशी' हा सिनेमा आला. तर पुढील वर्षी २०२५ ला परेश-मधुगंधाचा आणखी एक सुंदर सिनेमा रिलीज होत आहे. मधुगंधाने पोस्ट शेअर करत एलिझाबेथ एकादशी बनवतानाचा अनुभव शेअर केला आहे. ती लिहिते, "माझं बालपण पंढरपुरात गेलं. वडील खूप लहान असताना वारले. त्यांच्या मागे मुलांना शिकवून मोठं करण्याची धडपड माझी आई करत होती. तिचा आटापिटा कळत होता म्हणून मी आणि माझ्या भावाने बांगड्या विकण्याचा छोटा व्यवसाय केला... आणि त्या अनुभवाचा पुढे झाला एलिझाबेथ एकादशी."

ती पुढे लिहिते, "दहा वर्षांपूर्वी हा चित्रपट बनवला...ना पैसे होते, ना धंद्याची अक्कल. फक्त पॅशन होती. स्वतःचे पैसे घालून सिनेमा बनवला...परेशचे बाबा पाठीशी उभे राहिले. माझं गाव पंढरपूर मदतीला धावून आलं. शैलेश बडवे, श्रीकांत बडवे... खूप मदत झाली. आमची चित्रपटातली मुलांची फौज, सगळे चित्रपटाच्या पाठीशी उभे होते . चित्रपट बनवला पण पुढे काय करायचं माहित नव्हतं. त्यावेळी झी स्टुडिओच्या नावाचा खूप दबदबा होता. निखिल साने सिनेमाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. उत्तम मार्केट केला. घरोघरी पोचवला. सगळे अवॉर्ड मिळाले. नॅशनल सुवर्ण कमळ. बॉक्स ऑफिसलाही धमाका. एलिझाबेथ माझ्यासाठी पहिला वहिला निर्मितीचा अनुभव होता. सुखद झाला निखिल साने यांच्या सोबतीने,पाठिंब्याने! दहा वर्षापूर्वी हे सगळं झालं….!

पुढे खूप टक्केटोणपे, खूप चांगले वाईट अनुभव घेतले. चांगल्या अनुभवांनी प्रोहोत्सान दिलं तर वाईट अनुभवांनी शिक्षण! ५ सिनेमे बनवले, त्यातल्या तीन सिनेमांना नॅशनल अवॉर्ड मिळालं आणि सर्व सिनेमांना रसिक प्रेक्षकांचं भरभरून प्रेम!"

Web Title: madhugandha kulkarni shares post about elizabeth ekadashi movie making and her childhood connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.