बकेट लिस्टच्या गाण्याच्या शूटिंगसाठी माधुरी दीक्षित आणि सुमित राघवन मलेशियात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 06:41 AM2018-01-25T06:41:49+5:302018-01-25T12:11:49+5:30
तिळगूळ घ्या, गोड गोड बोला म्हणत सगळ्यांचीच संक्रांत आपल्या पहिल्या – वहिल्या मराठी चित्रपटाच्या टायटल टीझर ने गोड करणा-या ...
त ळगूळ घ्या, गोड गोड बोला म्हणत सगळ्यांचीच संक्रांत आपल्या पहिल्या – वहिल्या मराठी चित्रपटाच्या टायटल टीझर ने गोड करणा-या माधुरीच्या या चित्रपटाच्या गाण्याच शूटिंग सध्या मलेशियात सुरू आहे. माधुरीसोबत या चित्रपटात नेमका कोणता कलाकार पाहायला मिळणार हा प्रश्न कित्येकांना पडला होता. नुकताचं या प्रश्नाचं उत्तर सुमित राघवनने त्याच्या सोशल मिडियावरून दिलं आहे. हो! सुमित राघवन हा हरहुन्नरी अभिनेता बकेट लिस्टच्या निमित्ताने धकधक गर्ल माधुरीबरोबर रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील रोमॅंटिक गाण्याच्या शूटींगसाठी माधुरी दीक्षित आणि सुमित राघवन तसेच बकेट लिस्टची टीम मलेशियात (लंकावी) जाऊन पोहोचली आहे. ब्लु मस्टँग क्रिएशन्स, डार्क हॉर्स सिनेमा आणि दार मोशन पिक्चर्स निर्मित बकेट लिस्ट या सिनेमाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊसकर यांनी केलं आहे. तर चित्रपटाची कथा तेजस प्रभा विजय देऊसकर आणि देवश्री शिवाडेकर यांनी लिहिली आहे. या मलेशिया सफारी निमित्ताने सुमित राघवनच्या बकेट लिस्टमधील एक इच्छा पूर्ण झाली असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
या चित्रपटात ती पुण्यात राहाणाऱ्या एका स्त्रीची भूमिका साकारत आहे. पुण्यात राहाणाऱ्या लोकांची बोलण्याची ढब ही मुंबईतील लोकांपेक्षा वेगळी असते. त्यामुळे सध्या ही बोलण्याची ढब शिकण्याचा माधुरी प्रयत्न करत आहे. एवढेच नव्हे तर या चित्रपटातील काही दृश्यांमध्ये माधुरी आपल्याला बाईक चालवताना दिसणार आहे. त्यामुळे माधुरी बाईकसुद्धा चालवायला शिकली. या चित्रपटासाठी माधुरी खूपच उत्सुक असल्याचे कळतेय. याविषयी या चित्रपटाचे दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देवसकर सांगतात, माझ्या चित्रपटाची कथा ही माधुरी यांना समोर ठेवूनच लिहिली होती. त्यामुळे या भूमिकेसाठी मी त्यांच्याशिवाय कोणाचा विचारदेखील करू शकत नव्हतो. या चित्रपटाची कथा ही एका खऱ्या घटनेवरून प्रेरित होऊन लिहिण्यात आली आहे. या चित्रपटाची कथा माधुरी यांना आवडल्यामुळे त्यांनी या भूमिकेसाठी लगेचच होकार दिला. माधुरी या खूपच चांगल्या कलाकार आहेत. त्या आपल्या भूमिकेसाठी सध्या प्रचंड मेहनत घेत आहेत. त्यांचे मराठी खूपच चांगले आहे. पण तरीही पुण्याचे लोक कोणत्या स्टाईलमध्ये बोलतात या त्या शिकत आहेत.