मधुर भांडारकर दिग्दर्शित 'इंडिया लॉकडाउन'मध्ये झळकणार सई ताम्हणकर, पोस्टर आऊट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 12:00 IST2022-11-03T11:52:27+5:302022-11-03T12:00:46+5:30
मराठी सिनेइंडस्ट्रीतील बिनधास्त आणि बोल्ड अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकरने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.

मधुर भांडारकर दिग्दर्शित 'इंडिया लॉकडाउन'मध्ये झळकणार सई ताम्हणकर, पोस्टर आऊट
मराठी सिनेइंडस्ट्रीतील बिनधास्त आणि बोल्ड अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर (Sai Tamhankar). तिने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. नुकतेच तिच्या आगामी चित्रपटातचे पोस्टर सोशल मीडियावर रिलीज झाले आहे. सई ताम्हणकरच्या 'इंडिया लॉकडाउन'चं पोस्टर आऊट झालं आहे. कोविड-१९ वर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन मधुर भांडारकर यांनी केलं आहे.
सई ताम्हणकरने पेट पुराण, बी.ई. असे अनेक प्रोजेक्ट्स देऊन मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून स्वतःचे नाव कोरले आहे. रोजगार, मीडियम स्पाइसी आणि इतर प्रोजेक्ट्स. सई 'सोलो' आणि 'नवरसा' सारख्या अनेक यशस्वी बहु-भाषिक चित्रपटांचा भाग आहे. मिमीमधील तिच्या सहाय्यक भूमिकेसाठी तिला यंदाच्या आयफा अवॉर्डसह फिल्मफेअर अवॉर्डवरही मिळाला. दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या आगामी कोव्हिड-19 वर आधारित चित्रपटात अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
इंडिया लॉकडाउनमध्ये सई व्यतिरिक्त प्रतीक बब्बर, श्वेता बसू प्रसाद, आहाना कुमरा, प्रकाश बेलावाडी आणि इतर कलाकार आहेत. या चित्रपटाचे लेखन अमित जोशी आणि आराधना साह यांनी केले असून पेन स्टुडिओ आणि पीजे मोशन पिक्चर्स यांनी निर्मिती केली आहे. मधुर भांडारकरचा हा रोमांचक चित्रपट २ डिसेंबरला झी ५ वर प्रदर्शित होणार आहे.