माधुरी दीक्षित तिच्या मराठी चित्रपटासाठी शिकतेय बाईक चालवायला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2017 09:35 AM2017-12-08T09:35:34+5:302017-12-08T15:05:34+5:30
माधुरी दिक्षितने तिच्या अभिनयाने, अदांनी, दिलखेच नृत्याने गेली अनेक वर्षं बॉलिवूडमध्ये राज्य केले आहे. तिने तिच्या आजवरच्या कारकिर्दीत अनेक ...
म धुरी दिक्षितने तिच्या अभिनयाने, अदांनी, दिलखेच नृत्याने गेली अनेक वर्षं बॉलिवूडमध्ये राज्य केले आहे. तिने तिच्या आजवरच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तिच्या अभिनयासाठी तिला आजवर अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. माधुरी दीक्षित ही महाराष्ट्रीयन असल्याने ही मराठी मुलगी प्रेक्षकांना मराठी चित्रपटात कधी पाहायला मिळणार याची उत्सुकता गेल्या अनेक वर्षांपासून लोकांना लागली आहे. माधुरीला अनेक वेळा मुलाखतीत याबाबत विचारण्यात देखील आले आहे. एखादी चांगली कथा असेल तर मराठीत काम करायला आवडेल असे तिने अनेकवेळा सांगितले आहे. आता माधुरी एका मराठी चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. माधुरीच्या पहिल्या मराठी चित्रपटाचे नाव अद्याप ठरले नसले तरी या चित्रपटाची कथा खूपच चांगली आणि हटके आहे. आपल्या अस्तित्वाचा शोध घेणाऱ्या एका स्त्रीचा प्रवास प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार असून माधुरी एका कणखर पण त्याचसोबत खट्याळ स्त्रीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देवसकर करणार असून ही कथा देखील त्यांनी आणि धनश्री शिवडेकर यांनी मिळून लिहिली आहे.
माधुरी तिच्या या आगामी चित्रपटासाठी सध्या चांगलीच मेहनत घेत आहे. या चित्रपटात ती पुण्यात राहाणाऱ्या एका स्त्रीची भूमिका साकारत आहे. पुण्यात राहाणाऱ्या लोकांची बोलण्याची ढब ही मुंबईतील लोकांपेक्षा वेगळी असते. त्यामुळे सध्या ही बोलण्याची ढब शिकण्याचा माधुरी प्रयत्न करत आहे. एवढेच नव्हे तर या चित्रपटातील काही दृश्यांमध्ये माधुरी आपल्याला बाईक चालवताना दिसणार आहे. त्यामुळे माधुरी सध्या बाईक चालवायला शिकत आहे. या चित्रपटासाठी माधुरी खूपच उत्सुक असल्याचे कळतेय. याविषयी या चित्रपटाचे दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देवसकर सांगतात, माझ्या चित्रपटाची कथा ही माधुरी यांना समोर ठेवूनच लिहिली होती. त्यामुळे या भूमिकेसाठी मी त्यांच्याशिवाय कोणाचा विचारदेखील करू शकत नव्हतो. या चित्रपटाची कथा ही एका खऱ्या घटनेवरून प्रेरित होऊन लिहिण्यात आली आहे. या चित्रपटाची कथा माधुरी यांना आवडल्यामुळे त्यांनी या भूमिकेसाठी लगेचच होकार दिला. माधुरी या खूपच चांगल्या कलाकार आहेत. त्या आपल्या भूमिकेसाठी सध्या प्रचंड मेहनत घेत आहेत. त्यांचे मराठी खूपच चांगले आहे. पण तरीही पुण्याचे लोक कोणत्या स्टाईलमध्ये बोलतात या त्या शिकत आहेत. त्याचसोबत या चित्रपटासाठी त्या सध्या बाईक चालवायला देखील शिकत आहेत.
Also Read : अनिल कपूरने आपल्या यशाचे श्रेय दिले या अभिनेत्रीला