Maha Kumbh 2025: 'ही' अभिनेत्री महाकुंभमेळ्यात सादर करणार शिव तांडव स्त्रोत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 12:38 IST2025-01-14T12:38:12+5:302025-01-14T12:38:24+5:30

लोकप्रिय अभिनेत्री भव्य आध्यात्मिक महाकुंभमेळ्यात लाईव्ह परफॉर्मन्स करणार आहे.

Mahakumbh Mela 2025 Adah Sharma Set To Perform Shiva Tandav Stotram In Prayagraj | Maha Kumbh 2025: 'ही' अभिनेत्री महाकुंभमेळ्यात सादर करणार शिव तांडव स्त्रोत!

Maha Kumbh 2025: 'ही' अभिनेत्री महाकुंभमेळ्यात सादर करणार शिव तांडव स्त्रोत!

Maha Kumbh Mela 2025:  जगातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा अशी ओळख असलेला कुंभ मेळा सोमवारी (13 जानेवारी) प्रयागराजमध्ये (Mahakumbh Mela 2025 begins in Prayagraj ) सुरू झाला आहे. हा मेळा १३ जानेवारी रोजी सुरू झाला असून २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. प्रयागराज हे भारतातील सर्वात महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे.  प्रयागराजमधील गंगा, यमुना, सरस्वती या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमावर भक्तीसागर उसळला आहे. कलाकार या मेळ्याची शोभा वाढवणार आहेत. अभिनेत्री अदा शर्मा ( Adah Sharma) ही शिव तांडव (Shiv Tandav Stotram) सादर करणार आहे. 

अदा शर्मा ही भव्य आध्यात्मिक महाकुंभमेळ्यात लाईव्ह परफॉर्मन्स करणार आहे. ती शिव तांडव स्तोत्राचे थेट पठण करणार आहे. अदा शर्मा ही मोठी शिवभक्त आहे. तिला शिव तांडव स्रोत्र पूर्ण पाठ आहे. याआधी तिनं सोशल मीडियावर शिव तांडव स्तोत्राचे उत्कृष्ट पठण केल्याचा व्हिडीओ शेअर केला होता. जो प्रचंड व्हायरल झाला होता. आता तिला थेट महाकुंभमेळ्यात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 

फक्त अदा शर्माचं नाही तर महाकुंभमेळ्यात अनेक सेलिब्रिटी सहभागी होण्याची शक्यता आहे. अमिताभ बच्चनसह अनेक बॉलिवूड कलाकारांना आमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. शंकर महादेवन, कैलाश खेर, शान हे गायकदेखील मेळ्याची शोभा वाढवणार आहेत. त्यांचा खास परफॉर्मन्स होणार आहे.  


 मिळालेल्या माहितीनुसार, कुंभमेळ्यात बॉलिवूड स्टार्स लाईव्ह शो सादर करतील.  शंकर महादेवन यांच्यापासून सादरीकरणाची सुरुवात होणार आहे. यानंतर साधना सरगम ​​(२६ जानेवारी), शान (२७ जानेवारी), रंजनी आणि गायत्री (३१ जानेवारी) सादरीकरण करणार आहेत. तर कैलाश खेर २३ फेब्रुवारी रोजी आपला शो करणार आहेत. २४ फेब्रुवारी रोजी मोहित यांच्या भव्य कार्यक्रमाने कुंभ कार्यक्रमाचा समारोप होईल. 

Web Title: Mahakumbh Mela 2025 Adah Sharma Set To Perform Shiva Tandav Stotram In Prayagraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.