पुन्हा देशमुख कुटुंबातला मुख्यमंत्री होणार का? जिनिलियाच्या उत्तराने वेधलं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 06:00 PM2024-11-20T18:00:02+5:302024-11-20T18:14:30+5:30
आज राज्यभरात विधानसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळते आहे.
Jenelia Deshmukh: आज राज्यभरात विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election 2024 )उत्साह पाहायला मिळतो आहे. महाराष्ट्रात मविआ व महायुतीत सत्तेसाठीची चुरस आहे. त्यामुळे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण असेल? मतदारराजा कोणाला झुकतं माप देणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अशातच सोशल मीडियावर अभिनेत्री जिनिलिया देशमुखचा व्हायरल होणारा एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरलाय. या व्हिडीओमध्ये जिनिलियाला एक प्रश्न विचारण्यात आला ज्यावर तिने दिलेल्या उत्तराने अनेकांचं लक्ष वेधलं आहे.
#WATCH | After casting her vote for #MaharashtraAssemblyElections, Actor Genelia D'Souza says "Everyone has the right to cast their votes. People should come out and practice their right. It is an important day today, you can make a big difference..." pic.twitter.com/IU4sEAdAtS
— ANI (@ANI) November 20, 2024
विलासराव देशमुख हे महाराष्ट्रातील लोकप्रिय राजकीय नेत्यांपैकी एक होते. यंदाच्या त्यांची दोन्ही मुले विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरली आहेत. महाविकास आघाडीला जर बहुमत मिळालं तर महाराष्ट्राचा होणारा मुख्यमंत्री तुमच्या घरातून व्हावा असं तुम्हाला वाटतं का? असा प्रश्न ऑनकॅमेरा अभिनेत्रीला विचारला गेला त्यावर उत्तर देताना ती म्हणाली,"सध्या आम्ही याबद्दल काहीच बोलू शकत नाही. जर महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री देशमुख कुटुंबातील असेल तर मला प्रचंड आनंद होईल. पण, जनता आपला कौल कोणाला देणार? यावर ते अवलंबुन आहे."
दरम्यान, अभिनेता रितेश राजकारणात नसला तरी त्याचे दोन्ही भाऊ अमित आणि धीरज हे राजकारणात सक्रीय आहेत. दोघंही लातूरच्या दोन सीटवर काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. अमित देशमुख हे लातूर शहरातून निवडणूकीच्या रिंगणात आहेत तर धीरज देशमुख (Dhiraj Deshmukh) लातूर ग्रामीण मधून मैदानात आहेत. अमित देशमुख हे चौथ्यांदा निवडणूकीच्या रिंगणात आहेत. २००९ मध्ये त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. आतापर्यंत तीनही निवडणूकांमध्ये त्यांनी विजय मिळवला आहे. तर धीरज देशमुख दुसऱ्यांदा निवडणूकीत उतरले आहेत. याआधी २०१९ साली त्यांनी निवडणूक लढवली आणि विजयही मिळवला होता.