​सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2018 10:25 AM2018-04-23T10:25:55+5:302018-04-23T15:55:55+5:30

महाराष्ट्रदिनी फक्त महाराष्ट्राच्या मातीचे गोडवे न गाता आपल्या घामाने महाराष्ट्राच्या मातीचे ऋण फेडायचे असे एका अभिनेत्रीने ठरवले आहे. अभिनेत्री ...

Maharashtra Day celebrations by doing Sai Tamhankar Shramdan | ​सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन

​सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्रदिन

googlenewsNext
ाराष्ट्रदिनी फक्त महाराष्ट्राच्या मातीचे गोडवे न गाता आपल्या घामाने महाराष्ट्राच्या मातीचे ऋण फेडायचे असे एका अभिनेत्रीने ठरवले आहे. अभिनेत्री सई ताम्हणकर पुण्याजवळच्या गावात येत्या १ मे रोजी श्रमदान करणार आहे. सई गेली तीन वर्षं पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात पाणीटंचाईविरहित महाराष्ट्रासाठी आपले योगदान देते आहे. यंदाही आपल्या बाकी सर्व व्यावसायिक जबाबदाऱ्यांना बाजूला ठेवत सई श्रमदानामध्ये १ मे रोजी सक्रिय सहभागी झालेली दिसणार आहे. सई ताम्हणकरला याविषयी विचारले असता ती सांगते, “मी हे स्वानुभवाने सांगु शकते की, रणरणत्या उन्हात श्रमदान करताना आपला घाम जेव्हा मातीत मिसळतो, तेव्हा मातीच्या येणाऱ्या सुगंधाची बरोबरी कोणताही महागडा परफ्युम देखील करू शकणार नाही. त्यामुळेच पाणी फाउंडेशन जेव्हा जेव्हा श्रमदानासारखे उपक्रम आयोजित करतं, तेव्हा त्यात सक्रिय सहभाग घेणं, ही माझ्यासाठी प्राथमिकता असते.”
सई ताम्हणकर तिच्या श्रमदानाच्या अनुभवाबद्दल सांगते, “पाणी फाउंडेशनसाठी मी गेल्या तीन वर्षात पश्चिम महाराष्ट्र फिरले आहे. एकदा एका गावात मी श्रमदानासाठी गेले होते. तिथल्या सरपंचाने माझे काम पाहून दिलेली प्रतिक्रिया आजही माझ्या चांगल्याच लक्षात आले. माझ्या हातात कुदळ-फावडा पाहून ते म्हणाले होते की, मी आजपर्यंत कुठल्याच हिरोइनला पाण्यासाठी आमच्या गावात येऊन काम करताना पाहिले नव्हते. 
त्या गावातील सरपंचाने माझे भरभरून कौतुक केले होते. त्यांनी केलेल्या कौतुकामुळेच माझा काम करण्याचा हुरूप अजूनच वाढला. आपल्या समाजात  ‘अन्नदाता सुखी भव’ असं म्हणायची पद्धत आहे. त्यामुळे जर आपल्या अन्नदात्याला म्हणजेच शेतकऱ्याला खरंच सुखी करायचं असेल, तर सुरुवात श्रमदान करून त्याच्या शेतीला मुबलक पाणी पोहोचवण्यापासून करायला हवी.”
सई ताम्हणकरने दुनियादारी, बालक पालक, नो एंट्री पुढे धोका आहे, वजनदार यांसारख्या चित्रपटांमधून तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. आज मराठी इंडस्ट्रीतील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. तिने मराठी चित्रपटांसोबतच गजनी, हंटर यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. 

Also Read : पतीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर सई ताम्हणकर पुन्हा पडली प्रेमात

Web Title: Maharashtra Day celebrations by doing Sai Tamhankar Shramdan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.