'ही' चूक गौरव मोरेला पडली महागात; लंडनच्या विमानतळावर झाली कसून चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 08:00 AM2023-10-11T08:00:31+5:302023-10-11T08:04:23+5:30

Gaurav more: गौरवने नुकतंच लंडनमध्ये त्याच्या आगामी सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं.

maharashtrachi-hasya-jatra-fame-gaurav-more-was-stopped-at-the-airport-know-more-about-this | 'ही' चूक गौरव मोरेला पडली महागात; लंडनच्या विमानतळावर झाली कसून चौकशी

'ही' चूक गौरव मोरेला पडली महागात; लंडनच्या विमानतळावर झाली कसून चौकशी

सध्याच्या घडीला गौरव मोरे ( gaurav more) हे नाव कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर गौरवने तुफान लोकप्रियता मिळवली आहे. इतकंच नाही तर महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा गौरव लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. त्यामुळे सध्या या आगामी सिनेमामुळे तो चर्चेत येत आहे. या सिनेमाचं लंडनमध्ये चित्रीकरण झालं असून लंडनच्या विमानतळावर गौरवला आडवण्यात आलं होतं. नुकताच हा भन्नाट किस्सा एका मुलाखतीमध्ये सांगण्यात आला.

गौरव लवकरच 'बॉईज 4' या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाचं लंडनमध्ये शूटिंग झालं आहे. त्यामुळे या संपूर्ण टीमकडे या लंडनवारीचे अनेक किस्से आहेत. विशेष म्हणजे शूटिंगला पोहोचण्यापूर्वीच गौरवला विमानतळावर आडवण्यात आलं होतं. अभिनेता पार्थ भालेराव याने गौरवचा हा किस्सा ‘मीडिया टॉक’ या मराठी एंटरटेन्मेंट युट्यूब चॅनल सांगितला आहे.

नेमकं काय घडलं लंडनच्या विमानतळावर?

गौरव सिनेमाच्या शूटिंगसाठी मुंबईहून युकेला येत होता. त्यावेळी युकेमध्ये इमिग्रेशनच्या वेळी त्याला तेथील काही अधिकाऱ्यांनी  इथे का आलात? इथे यायचा उद्देश काय? असे काही प्रश्न विचारुन त्याची चौकशी केली. परंतु, या अधिकाऱ्यांना गौरवने अशी काही उत्तरं दिली ज्यामुळे त्या अधिकाऱ्यांनी त्याला थांबवून घेतलं. इथे कशासाठी आलात? हा प्रश्न विचारताच, गौरवने शूटिंगला आलोय असं उत्तर दिलं. त्या अधिकाऱ्यांनी शूटिंग हा शब्द ऐकल्यानंतर त्याला ताबडतोब थांबवून घेतलं, असं पार्थने यावेळी सांगितलं.

फिल्टरपाड्याच्या बच्चनवर DDLJ चा फिव्हर; डबलडेकर बसमध्ये गौरवने रिक्रिएट केलं शाहरुखचं गाणं

दरम्यान, गौरवसोबत हा प्रकार घडल्यानंतर संपूर्ण टीमला सिनेमाच्या शूटिंगसाठी किंवा फिल्मोग्राफीसाठी आलोय असं म्हणायचं असं सांगण्यात आलं. दरम्यान गौरव मोरेसोबत या सिनेमात सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड, ऋतिका श्रोत्री, अभिनय बेर्डे, निखील बने, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे, गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील अशी तगडी स्टारकास्ट झळकणार आहे.

Web Title: maharashtrachi-hasya-jatra-fame-gaurav-more-was-stopped-at-the-airport-know-more-about-this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.