Prajakta Mali : 'लग्न करणं गरजेचं आहे?' प्राजक्ताच्या प्रश्नावर काय दिलं श्री श्री रविशंकर यांनी उत्तर, पाहा Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 13:21 IST2024-08-08T13:14:00+5:302024-08-08T13:21:30+5:30
प्राजक्ता माळीचा आज ३५ वा वाढदिवस आहे.

Prajakta Mali : 'लग्न करणं गरजेचं आहे?' प्राजक्ताच्या प्रश्नावर काय दिलं श्री श्री रविशंकर यांनी उत्तर, पाहा Video
Prajakta Mali Birthday : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. अनेक मालिका, चित्रपट, वेब सीरिजमध्ये काम करणाऱ्या प्राजक्ताने लाखो चाहते आहेत. आज प्राजक्ताचा ३५ वा वाढदिवस आहे. या खास दिवशी तिचा एक जुना व्हिडीओ चर्चेत आला आहे. यामध्ये ती तिचे गुरु श्री श्री रविशंकर ( Sri Sri Ravishankar) यांच्याशी लग्नासंदर्भात बोलताना दिसत आहे.
सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलेला प्राजक्ताचा व्हिडीओ हा श्री श्री रवीशंकर यांच्या आश्रमातला आहे. काही महिन्यांपुर्वी प्राजक्ता ही प्राजक्ता तिच्या सर्व कामातून ब्रेक घेत ती श्री श्री रवीशंकर यांच्या बंगळूर येथील आश्रमात पोहोचली होती. यावेळी प्राजक्ताने 'लग्न करणं गरजेचं आहे का?' असा प्रश्न थेट श्री श्री रवीशंकर यांना विचारला होता. यावर मिश्किल उत्तर देत रवीशंकर म्हणाले, 'तुम्ही हा प्रश्न मला विचारताय. असं असतं तर माझ्या बाजूला आणखी एक खुर्ची लागली असती. डबल सोफा लावावा लागला असता'.
श्री श्री रवीशंकर पुढे म्हणाले, 'अशी काही आवश्यकता नाही. लग्न करुन असो किंवा एकट्याने असो फक्त आनंदी राहिलं पाहिजे. काही लोकांचं काय होतं, ते लग्न करूनही दु:खी असतात आणि एकट्यातही दु:खीच असतात. तर काही लोक असेही असतात. जे लग्न न करताही आनंदी राहतात आणि लग्न करूनही आनंदी राहतात. दुसऱ्यांनाही ते आनंद देत असतात. हे तुम्ही ठरवा. तुम्हाला काय आवडंत. मला वाटतं की आनंदी राहण्याचा पर्याय सर्वांनी निवडायला हवा'
प्राजक्ताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, ती 'जुळून येती रेशीमगाठी', 'नकटीच्या लग्नाला यायचं हं' यांसारख्या प्रसिद्ध मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली. त्यासोबतच प्राजक्ता ही महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसते. अभिनेत्री शिवाय प्राजक्ता ही एक बिझनेसवुमनदेखील आहे. 'प्राजक्तराज' नावाचा तिचा ज्वेलरीचा व्यवसाय आहे. तिच्या या पारंपारिक दागिन्यांना खूप चांगला रिस्पॉन्स मिळताना दिसतो.