मोठ्या थाटामाटात पार पडला महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2016 10:11 PM2016-04-02T22:11:37+5:302016-04-02T16:29:58+5:30

महाराष्ट्रीयनांचा सन्मान करण्यासाठी लोकमतने सुरू केलेला  महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर पुरस्कार सोहळा मोठ्या थाटामाटात एनसीपीए येथे पार पडला . 

The Maharashtrian of the Year award ceremony was held in a big way | मोठ्या थाटामाटात पार पडला महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळा

मोठ्या थाटामाटात पार पडला महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळा

googlenewsNext
style="margin: 0px; padding: 0px; border: 0px; outline: 0px; vertical-align: top; color: rgb(0, 0, 0); font-family: itf_devanagarimediumfont; font-size: 15px; line-height: 26px; background-image: initial; background-attachment: initial; background-size: initial; background-origin: initial; background-clip: initial; background-position: initial; background-repeat: initial;">या भूमीशी ज्यांनी रक्ताचे आणि घामाचे नाते जोडले, ज्यांनी आपले आयुष्य इथल्या समृद्धीसाठी वेचले, अशा महाराष्ट्रीयनांचा सन्मान करण्यासाठी लोकमतने सुरू केलेला महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर पुरस्कार सोहळा मोठ्या थाटामाटात एनसीपीए येथे पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला वेगवेगळ्या क्षेत्रातील  दिग्गजांनी उपस्थिती लावली. पुरस्कार सोहळ्यात कला, क्रीडा, चित्रपट, रंगभूमी, विज्ञान, तंत्रज्ञान, बिझनेस, इन्फ्रास्ट्रक्चर, समाजकारण, राजकारण, प्रशासन अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला
 

 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान, नाना पाटेकर, रणवीर सिंग, आशा भोसले, नीता अंबानी, पंकजा मुंडे, नितीन गडकरी, प्रफुल्ल पटेल यांच्यासह अनेक दिग्गज या कार्यक्रमाला उपस्थित होते. पुरस्कार सोहळ्यादरम्यान घेण्यात आलेल्या मुलाखतीदरम्यान दिग्गजांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या तर रणवीर आणि आमीर खानने मल्हारी गाण्यावर डान्स करत मनोरंजनदेखील केलं.





नीता अंबानी यांना  'महाराष्ट्र युथ आयकॉन ऑफ द इयर' पुरस्कार देण्यात आला. 



चिरतरुण गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. मला अजून महाराष्ट्र सरकारने जीवनगौरव दिलेला नाही, पण लोकमतने दिलेला हा पुरस्कार मला त्याच तोलामोलाचा वाटतो असे सांगत आशाताईंनी हा पुरस्कार स्वीकारला. तसेच हा पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मिळाला हे भाग्य असे उद्गारही त्यांनी काढले.


अभिनेता रणवीर सिंगलाही लोकमत अभिमान पुरस्कार देण्यात आला. 



ॠषी दर्डांनी घेतली आमीर खानची मुलाखत



‘मी काम करताना यशाचा विचार करत नाही’ असे मनोगत आमीर खानने लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१६ च्या व्यासपीठावर व्यक्त केले. लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक ॠ षी दर्डा यांनी त्यांची मुलाखत घेतली. प्रश्नांना मनमोकळी उत्तरे देत आपल्या भावना बोलून दाखविल्या. लोकमत व लोकमतच्या वाचकांचे आभार यापुरस्काराच्या निमित्ताने आमीरने मानले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे, प्रणिती शिंदे, शायना एनसी आणि विश्वजीत कदम यांची मुलाखत घेतली आणि महाराष्ट्रीयन ऑफ दी इयरच्या व्यासपीठावर ते झाले मुलाखतकार!


 
एका नजरेत पुरस्कार विजेत्यांची नावे - 
लोकसेवा , समाजसेवा - रज्जाक जब्बारखान पठाण
विज्ञान तंत्रज्ञान - प्रा. दिपक फाटक (आयटी तज्ञ)
परफॉरमिंग आर्ट - शंकर महादेवन
कला - शशिकांत धोत्रे, पेन्सील स्केच
क्रीडा - ललिता बाबर
रंगभूमी - मुक्ता बर्वे
चित्रपट (स्त्री) - अमृता सुभाष
चित्रपट (पुरुष) - नाना पाटेकर
इन्फ्रास्ट्रक्चर -  सतीश मगर
बिझनेस - डॉ आनंद देशपांडे
प्रशासन - विभागीय -  संदीप पाटील, (जिल्हा पोलिस प्रमुख, गडचिरोली)
प्रशासन - राज्यस्तर - अजोय मेहता, मुंबई महापालिका आयुक्त
राजकारण / कोणाकडून आहेत अपेक्षा? - खासदार राजीव सातव - काँग्रेस - मराठवाडा
राजकारण / प्रभावी राजकारणी कोण? - नितीन गडकरी - भाजपा - विदर्भ

 

Web Title: The Maharashtrian of the Year award ceremony was held in a big way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.