​महेश मांजरेकर आणि मकरंद अनासपुरेचा ‘Thank U विठ्ठला’ ३ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2017 04:44 AM2017-10-30T04:44:06+5:302017-10-30T10:14:06+5:30

विषयातील आणि मांडणीतील वेगळेपण हे आजच्या मराठी चित्रपटांचे वैशिष्ट्य ठरत आहे. असंख्य स्वप्नं घेऊन जगणाऱ्या आणि रोजच्या जगण्याशी दोन ...

Mahesh Manjrekar and Makrand Anaspurecha to thank 'Thank You Vitthal' on November 3th | ​महेश मांजरेकर आणि मकरंद अनासपुरेचा ‘Thank U विठ्ठला’ ३ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस

​महेश मांजरेकर आणि मकरंद अनासपुरेचा ‘Thank U विठ्ठला’ ३ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस

googlenewsNext
षयातील आणि मांडणीतील वेगळेपण हे आजच्या मराठी चित्रपटांचे वैशिष्ट्य ठरत आहे. असंख्य स्वप्नं घेऊन जगणाऱ्या आणि रोजच्या जगण्याशी दोन हात करणाऱ्या एका अवलियाची गोष्ट रंजकपणे मांडणारा ‘Thank U विठ्ठला’ हा मराठी चित्रपट येत्या ३ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जगण्याचा अर्थ उलगडून सांगणारा ‘Thank U विठ्ठला’ हा चित्रपट एम.जी.के प्रोडक्शनची प्रस्तुती असून या चित्रपटाची निर्मिती गोवर्धन काळे, गौरव काळे आणि अंजली सिंग यांनी केली आहे. कथा, दिग्दर्शन देवेंद्र जाधव यांचे आहे. 
एखाद्या माणसाने जर मनाशी पक्के ठरवले, तर तो आयुष्यात कुठल्याही समस्येवर मात करून यशस्वी होऊ शकतो, ही या चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना आहे. प्रत्येकाला नेहमीच दुसऱ्याच्या आयुष्याचा हेवा वाटत असतो. इतरांसारखे आयुष्य आपल्या वाट्याला नाही, याबद्दल तक्रार करत आपल्या हाती असलेले सहज सुंदर जगणंही हल्ली प्रत्येकजण विसरून गेले आहे. ‘Thank U विठ्ठला’ या चित्रपटातही आयुष्याला कंटाळलेल्या एका व्यक्तीचा प्रवास मांडण्यात आला असून या प्रवासात त्याला मिळालेल्या विठ्ठलाच्या साथीमुळे काय बदल घडतो? याची रंजक कथा या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
‘Thank U विठ्ठला’ या चित्रपटात निर्माते, अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर विठ्ठलाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत मकरंद अनासपुरे मुंबईच्या डबेवाल्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या दोघांसोबत दीपक शिर्के, कमलेश सावंत, स्मिता शेवाळे, सुनील गोडबोले, प्रदीप पटवर्धन, किशोर चौघुले, जयवंत वाडकर, योगेश शिरसाट, अभिजीत चव्हाण, मौसमी तोंडवळकर, पूर्वी भावे, तेजा देवकर, आणि बालकलाकार वरद यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
सादरीकरण आणि मांडणीत वैविध्य असलेल्या या सिनेमाचे संगीत देखील रिफ्रेशिंग झालंय. विजय शिंदे, दीपक कांबळी, मच्छिंद्र मोरे यांच्या लेखणीतून साकारलेल्या गीतांना रोहन-रोहन यांनी संगीतबद्ध केलं आहे. ‘मोबाईल’, ‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठला’ आणि ‘लोणचं’ अशी वेगवेगळ्या जॉंनरची तीन गाणी या चित्रपटात आहेत. उत्तम स्टारकास्ट, दमदार संगीत असलेल्या ‘Thank U विठ्ठला’ या चित्रपटातील सुमधूर गीतांचा हा नजराणा प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील. 
चित्रपटाचे सहनिर्माते एम.सलीम असून पटकथा ही त्यांचीच आहे. संवाद एम.सलीम आणि योगेश शिरसाट यांचे आहेत. छायांकन दिनेश सिंग तर संकलन अजय नाईक यांचे आहे. ३ नोव्हेंबरला ‘Thank U विठ्ठला’ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Also Read : ​मकरंद बनला मुंबईचा डबेवाला

Web Title: Mahesh Manjrekar and Makrand Anaspurecha to thank 'Thank You Vitthal' on November 3th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.