Mahesh Manjrekar : ‘बिग बॉस मराठी’च्या एका एपिसोडसाठी महेश मांजरेकर किती मानधन घेतात माहितीये?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 10:20 AM2022-08-16T10:20:50+5:302022-08-16T10:22:30+5:30

Mahesh Manjrekar Birthday: मराठी इंडस्ट्रीत महेश मांजरेकर यांचा आदरयुक्त दरारा आहे. निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते, लेखक अशी ओळख असलेले महेश वामन मांजरेकर यांचा आज वाढदिवस.

Mahesh Manjrekar Birthday Bigg Boss Marathi per episode FEES | Mahesh Manjrekar : ‘बिग बॉस मराठी’च्या एका एपिसोडसाठी महेश मांजरेकर किती मानधन घेतात माहितीये?

Mahesh Manjrekar : ‘बिग बॉस मराठी’च्या एका एपिसोडसाठी महेश मांजरेकर किती मानधन घेतात माहितीये?

googlenewsNext

Mahesh Manjrekar Birthday:   मराठी इंडस्ट्रीत महेश मांजरेकर यांचा आदरयुक्त दरारा आहे. निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते, लेखक अशी ओळख असलेले महेश वामन मांजरेकर यांचा आज वाढदिवस. आज मांजरेकर आपला 64 वा वाढदिवस साजरा करत आहेत. वास्तव, अस्तित्व, विरूद्ध अशा दर्जेदार सिनेमांचं दिग्दर्शन करणाऱ्या मांजरेकरांनी मराठी चित्रपटसृष्टीलाही भरभरून दिलं. नटसम्राट, काकस्पर्श, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, दे धक्का अशा सुपरहिट सिनेमांसाठी त्यांना ओळखलं जातं. टेलिव्हिजनवर तर ‘बिग बॉस’ अशी त्यांची ओळख आहे. लवकरच ‘बिग बॉस मराठी’चा चौथा सीझन ते घेऊन येणार आहेत.

बिग बॉस मराठी’ला महेश मांजरेकर यांनी खास ओळख दिली. त्यांच्या सूत्रसंचलनाच्या कडक स्टाईलने प्रेक्षकांची मनं जिकंली. बिग बॉस मराठीची तिन्ही पर्व त्यांनी गाजवली.  दर आठवड्याच्या शेवटी मांजरेकर ज्या पद्धतीने स्पर्धकांची शाळा घेतात, ते म्हणजे आणखीच वेगळा अनुभव. अनेकजण तर केवळ यासाठी बिग बॉस मराठी हा शो पाहतात. पण या शोसाठी महेश मांजरेकर किती मानधन घेतात माहितीये का?

रिपोर्टनुसार, बिग बॉस मराठीच्या एका एपिसोडसाठी ते तब्बल 25 लाख रुपये मानधन घेतात. म्हणजे, एकूण मानधनाचा विचार केला तर ते कोटींच्या घरात आहे.  हे आकडे आधीच्या सीझनचे आहे. आगामी सीझनच्या त्यांच्या मानधनात वाढ झाली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे. अर्थात या मानधनाबद्दल कोणीतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.  
  महेश यांचं नेट वर्थ हे जवळपास 40 कोटींच्या घरात असल्याचं सांगितलं जातं. महेश प्रत्येक सिनेमासाठी 30-50 लाख रुपये आकारतात असं सुद्धा सांगितलं जातं. अर्थात आम्ही याबद्दलची पुष्टी करत नाही.

महेश मांजरेकर यांची लहानपणापासूनच अभिनयाकडे ओढ होती. मांजरेकर यांनी कॉलेजमध्ये असतानाच थिएटर करायला सुरुवात केली.  1984 साली ‘अफलातून’ या बहुचर्चित मराठी नाटकातून त्यांनी अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. अभिनयाची त्यांची आवड आणि उत्सुकता त्यांना चित्रपट उद्योगाकडे घेऊन गेली आणि आज महेश मांजरेकर हे चित्रपटसृष्टीतील मोठ नावं आहे.

Web Title: Mahesh Manjrekar Birthday Bigg Boss Marathi per episode FEES

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.