Gauri Ingawale Home Video : महेश मांजरेकरच्या मानसकन्येनं घेतलं नवं घर, खऱ्या आईवडिलांसोबत केला गृहप्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2023 16:31 IST2023-05-14T16:30:44+5:302023-05-14T16:31:49+5:30
आतापर्यंत गौरीची ओळख ही महेश मांजरेकर यांची मानसकन्या अशीच होती. मात्र व्हिडिओत तिचं खरं कुटुंब दिसत आहे.

Gauri Ingawale Home Video : महेश मांजरेकरच्या मानसकन्येनं घेतलं नवं घर, खऱ्या आईवडिलांसोबत केला गृहप्रवेश
मराठी सिनेमा 'पांघरुण'मध्ये मुख्य भूमिका साकारणारी मराठी अभिनेत्री गौरी इंगावले (Gauri Ingawale) हिने नुकतंच नवं घर खरेदी केलं आहे. आई वडिलांसोबत नव्या घरात प्रवेश करतानाचा व्हिडिओ तिने अपलोड केला आहे. तिच्या या यशामुळे तिचं कौतुकही होतंय. तर यावेळी गौरीचे खरे आईवडील समोर आले आहेत. आतापर्यंत गौरीची ओळख ही महेश मांजरेकर यांची मानसकन्या अशीच होती. मात्र व्हिडिओत तिचं खरं कुटुंब दिसत आहे.
गौरी इंगावले हिने लहानपणापासूनच अभिनय क्षेत्रात काम करायला सुरु केले. याशिवाय ती उत्तम डान्सरही आहे. गौरी नेहमीच मांजरेकर कुटुंबासोबत दिसते. ती तिथेच लहानाची मोठी झाली आहे. मात्र गौरीचं खरं कुटुंब वेगळंच आहे. महेश मांजरेकर यांनी तिच्या पालनपोषणाची जबाबदारी घेतली होती. नुकताच गौरीने नवीन घर घेतल्याचा आनंद चाहत्यांसोबत शेअर केलाय. आपल्या आईवडिलांच्या हाताने तिने नवीन घराची पूजा केली.
गौरीने नुकतेच 'दे धक्का २' सिनेमात भूमिका साकारली. तर ती आता 'वेडात मराठे वीर दौडले सात' या महेश मांजरेकर यांच्या सिनेमातही भूमिका साकारणार आहे. गौरीला एक सख्खी बहीण आहे जिचं नाव गार्गी कुलकर्णी. ती जिम्नॅस्टिक्स करते. तिचीही झलक या व्हिडिओत दिसते. याशिवाय गौरीचा सत्या, सई या महेश मांजकेरकर यांच्या मुलांसोबतही चांगला बॉंड आहे.