महेश मांजरेकरांनी 'KGF' आणि अभिनेता यशबद्दल केलं मोठं विधान, म्हणाले - 'कन्नड सिनेइंडस्ट्री...'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 06:12 PM2022-09-16T18:12:53+5:302022-09-16T18:13:40+5:30
Mahesh Manjarekar: कन्नड सिनेइंडस्ट्रीबाबत दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर यांनी आपले मत मांडले आहे.
सध्या साउथ सिनेइंडस्ट्रीचा बोलबोला पाहायला मिळतो आहे. उत्तर भारतापासून ते भारताच्या पूर्व आणि पश्चिम कानाकोपर्यात लोकांना फक्त साउथचे चित्रपट जास्त आवडत असल्याचं पाहायला मिळत आहे. 'दृश्यम २', 'पुष्पा', 'मास्टर', 'विक्रम', 'आरआरआर' यासारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांनी केवळ भारतातच नाही तर जगभरातील चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. नुकतेच मराठी आणि बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) यांनी केजीएफ(KGF)च्या सुपरहिट यशानंतर कन्नड चित्रपटसृष्टीला नवी दिशा मिळाल्याचे एका कार्यक्रमात म्हटले.
बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, महेश मांजरेकर यांनी केजीएफ चित्रपटाचे निर्माते आणि कन्नड सिनेमाचे कौतुक केले आहे. मराठी चित्रपटांना नव्याने उभारण्याची गरज असल्याचं बोलले. १४ सप्टेंबर रोजी, परितोष पेंटरचा कॅलिडोस्कोप सिनेमा आणि राजेश मोहंती यांच्या एसआर एण्टरप्राइझने मुंबईतील एका कार्यक्रमात त्यांच्या बॅनरखाली ७ मराठी चित्रपटांची घोषणा केली. या कार्यक्रमात अनेक मराठी कलाकारांनीही सहभाग घेतला होता ज्यात महेश मांजरेकर देखील उपस्थित होते.
मीडिया रिपोर्टनुसार, काही वर्षांपूर्वी कन्नड सिनेइंडस्ट्री हळूहळू संपुष्टात येणार असे अनेकांना वाटत होते. पण अभिनेता यशच्या ‘केजीएफ’ चित्रपटाने या इंडस्ट्रीला सावरलं. ‘केजीएफ’च्या निर्मात्यांनी चित्रपटाचे दोन्ही भाग हिंदी भाषेमध्ये तयार केले नाहीत. या गोष्टीचा आनंद आहे. कन्नड भाषेमध्ये हा चित्रपट तयार करून हिंदीमध्ये डब केला. तसेच त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीबाबतही चर्चा केली. ते म्हणाले, कन्नड सिनेइंडस्ट्रीसारखं मराठी इंडस्ट्रीला नव्याने उभे राहण्याची गरज आहे. पण यासाठी यशसारखा अभिनेता असला पाहिजे.