महेश मांजरेकर सांगतायेत, हिंदी इंडस्ट्रीत शिस्त नसल्याने मी हिंदी इंडस्ट्रीपासून दूर राहाण्याचा निर्णय घेतला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2017 12:17 PM2017-02-07T12:17:15+5:302017-02-07T17:47:15+5:30

महेश मांजरेकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेला काकस्पर्श, नटसम्राट यांसारख्या चित्रपटाने ...

In Mahesh Manjrekar's confession, there is no discipline in the Hindi industry, so I decided to stay away from the Hindi industry. | महेश मांजरेकर सांगतायेत, हिंदी इंडस्ट्रीत शिस्त नसल्याने मी हिंदी इंडस्ट्रीपासून दूर राहाण्याचा निर्णय घेतला

महेश मांजरेकर सांगतायेत, हिंदी इंडस्ट्रीत शिस्त नसल्याने मी हिंदी इंडस्ट्रीपासून दूर राहाण्याचा निर्णय घेतला

googlenewsNext
ेश मांजरेकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेला काकस्पर्श, नटसम्राट यांसारख्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. आता ध्यानीमनी या चित्रपटात महेश मांजरेकर प्रेक्षकांना एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात अश्विनी भावे त्यांच्यासोबत प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा... 

ध्यानीमनी या प्रसिद्ध नाटकावर चित्रपट बनवायचा विचार कधी केला?
ध्यानीमनी या नाटकावर चित्रपट करायचा असे कित्येक वर्षांपासून या चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि या नाटकाचे लेखक प्रशांत दळवी यांच्या डोक्यात सुरू होते. या नाटकावर चांगला चित्रपट होऊ शकतो असे मलादेखील वाटले आणि त्यामुळेच हा चित्रपट करण्याचे ठरवले. 

तुम्ही सध्या अभिनयापेक्षा निर्मिती आणि दिग्दर्शनाला जास्त वेळ देता. असे असतानादेखील या चित्रपटात काम करण्याचा विचार कसा केला?
या चित्रपटात मी काम करावे असे चंद्रकांत कुलकर्णी यांना वाटत होते. मी या चित्रपटातील व्यक्तिरेखेपेक्षा खऱ्या आयुष्यात पूर्णपणे वेगळा असल्याने ही भूमिका साकारणे हे माझ्यासाठी आव्हानात्मक होते. पण हा चित्रपट केल्यानंतर एक चांगला चित्रपट आणि एक चांगली व्यक्तिरेखा साकारल्याचे मला समाधान मिळाले आहे. 

चित्रपटांसाठी प्रमोशम कितपत महत्त्वाचे असते असे तुम्हाला वाटते? 
पूर्वी चित्रपट बनवला की दिग्दर्शक-निर्मात्याचे काम संपत असे. पण आता चित्रपट बनवून झाल्यानंतरही प्रमोशनवर तितकीच मेहनत घ्यावी लागते. विविध माध्यमांमधून प्रमोशन करणे गरजेचे असते. या सगळ्यात वर्तमानपत्र हे प्रसिद्धीसाठी सगळ्यात महत्त्वाचे माध्यम आहे असे मी मानतो. ध्यानीमनी या चित्रपटासाठी तर आम्ही खूपच वेगळे प्रमोशन केले होते. अनेक कलाकारांकडून तुम्ही हा चित्रपट पाहू नका असा व्हिडिओ रेकॉर्ड करून घेतला होता आणि तो युट्युबला अपलोड केला होता. आमच्या या अनोख्या प्रमोशनला लोकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. यामुळे लोकांमध्ये या चित्रपटाविषयी चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे.

मराठी इंडस्ट्रीला खूप चांगले दिवस आले आहेत असे म्हटले जाते, याविषयी तुमचे काय मत आहे?
मराठी इंडस्ट्रीला चांगले दिवस आले आहेत असे मला तरी वाटत नाही. कारण खूपच कमी चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरत आहेत. जोपर्यंत हिट चित्रपटांचा टक्का वाढत नाही, तोपर्यंत मराठी इंडस्ट्रीला चांगले दिवस येणार नाहीत. सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये एक वेगळाच ट्रेंड आपल्याला पाहायला मिळत आहे. चित्रपट बनवण्यासाठी चित्रपट कसा बनवला जातो याची माहिती असणे आवश्यक असते असे अनेकांना वाटतच नाही. ज्याच्याकडे खूप सारा पैसा आहे, तो मराठी चित्रपट बनवत आहे. त्यांना चित्रपटाविषयी काहीही जाण नसल्याने यामुळे चित्रपटसृष्टीचे नुकसान होत आहे. यासाठी काही पावले उचलण्याचा माझा विचार सुरू आहे. काही निर्माते, दिग्दर्शक आणि डिस्ट्रीब्युटर्सने एकत्र यावे आणि चित्रपटाची निर्मिती करण्यास इच्छुक असलेल्या लोकांना मार्गदर्शन करावे असे मला वाटते आणि यासाठी मी पुढील काळात प्रयत्न करणार आहे.

हिंदीमध्ये वाँटेड, दबंगसारख्या चित्रपटात अतिशय चांगल्या भूमिका साकारल्यानंतरही तुम्ही हिंदी चित्रपटात खूप कमी काम करता, याचे कारण काय?
हिंदी चित्रपटसृष्टीत शिस्त नाहीये असे मला वाटते. कारण तुमच्याकडून घेतलेल्या तारखांवर चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होईल असे कधीच नसते. अनेकवेळा चित्रीकरणादरम्यान तारखा बदलतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या दुसऱ्या गोष्टींसाठी प्लानिंग करता येत नाही. याच गोष्टीमुळे हिंदीपासून दूर राहायचे मी ठरवले आहे. हिंदीच्या तुलनेत दाक्षिणात्य इंडस्ट्री शिस्तप्रिय आहे. मी गेल्या काही वर्षांत तिथे अनेक चित्रपट केले आहेत. 



Web Title: In Mahesh Manjrekar's confession, there is no discipline in the Hindi industry, so I decided to stay away from the Hindi industry.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.