महेश मांजरेकर यांची २०१७ ची पहिली निर्मिती असणारा 'ध्यानीमनी' चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2017 11:49 AM2017-01-30T11:49:19+5:302017-01-30T17:19:19+5:30

महेश मांजरेकर निर्मित नटसम्राट या चित्रपटाने २०१६ ची सुरुवातच जबरदस्त केली होती. आताही महेश मांजरेकर निर्मित ध्यानीमनी  हा चित्रपट ...

Mahesh Manjrekar's first production 'Dhyanamani' film which was released in 2017 | महेश मांजरेकर यांची २०१७ ची पहिली निर्मिती असणारा 'ध्यानीमनी' चित्रपट

महेश मांजरेकर यांची २०१७ ची पहिली निर्मिती असणारा 'ध्यानीमनी' चित्रपट

googlenewsNext
ेश मांजरेकर निर्मित नटसम्राट या चित्रपटाने २०१६ ची सुरुवातच जबरदस्त केली होती. आताही महेश मांजरेकर निर्मित ध्यानीमनी  हा चित्रपट १० फ्रेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. त्यांच्या या आगामी चित्रपटाची जबरदस्त उत्सुकता निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे. संपूर्ण मराठी सिनेसृष्टीचं विशेष लक्ष आणि हिंदी सिनेसृष्टीची उत्सुकता या चित्रपटाकडे लागून राहिली आहे. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रेटी, मराठी चित्रपटाचं भरभरून कौतुक देखील करत आहेत. बिग बी आणि सलमान खाननं यांनी ध्यानीमनी या चित्रपटाच्या ट्रेलरला मनापासून दाद दिली असून, ट्विटर आणि फेसबुकवरून चित्रपटाला शुभेच्छाही दिल्या आहेत. तसंच ध्यानीमनीचा अत्यंत कुतूहलपूर्ण ट्रेलरही त्यांनी ट्विट केला आहे. सोशल मीडियावर या ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. 

         प्रेक्षकांना कायमच नाविन्यपूर्ण कलाकृती देणाºया  महेश मांजरेकरांची ही निर्मिती असून महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर आणि अनिरुद्ध देशपांडे यांच्या ग्रेट मराठा एंटरटेन्मेंट या प्रॉडक्शन हाऊसची ही कलाकृती आहे. तसेच स्मिता ठाकरे, अमोलख सिंग गाखल, इक्बालसिंग गाखल आणि राजेश बंगा हे या चित्रपटाचे सहनिमार्ते आहेत. आशयसंपन्न नाटकं आणि अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केलेल्या चंद्रकांत कुलकर्णी यांनी या चित्रपटाचं अत्यंत कल्पक असं दिग्दर्शन केलं आहे. प्रशांत दळवी यांनी चित्रपटाचे कथा पटकथा आणि संवाद लिहिले असून संदीप खरे यांनी गीतलेखन आणि अजित परब यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात महेश मांजरेकर, अश्विनी भावे, मृण्मयी देशपांडे आणि अभिजित खांडकेकर यांच्या अत्यंत ताकदीच्या अभिनयानं चित्रपटातील आपल्या भूमिका जिवंत केल्या आहेत. 

          विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने अश्विनी भावे या कसलेल्या अभिनेत्रीचा अभिनय बºयाच वर्षांनी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. चित्रपट हे असे माध्यम आहे जिथे अलीकडच्या काळात चित्रपटांच्या कथांचे विषयच नाही तर त्यांच्या प्रसार पद्धतीदेखील बदलत चाललेल्या दिसून येतात. हा सिनेमा बघू नका अशी विनंती सध्या अनेक दिग्गज कलाकार करत आहेत. कलाकारांच्या अशा आग्रही विनवण्यांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून सर्वत्र त्याचीच चर्चा होत आहे. 

Web Title: Mahesh Manjrekar's first production 'Dhyanamani' film which was released in 2017

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.