महेश मांजरेकरांची तिसरी लेकही आहे अभिनेत्री, नुकतीच झळकली होती या मराठी सिनेमात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 08:00 AM2022-03-13T08:00:00+5:302022-03-13T08:00:00+5:30
निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) यांच्या प्रोफेशनल लाइफविषयी सर्वांनाच ठावूक आहे. मात्र त्यांच्या पर्सनल लाइफबद्दल फार कमी लोकांना माहित आहे.
मराठी आणि हिंदी सिनेइंडस्ट्रीतील निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) यांच्या प्रोफेशनल लाइफविषयी सर्वांनाच ठावूक आहे. मात्र त्यांच्या पर्सनल लाइफबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. महेश मांजरेकर यांची पत्नी मेधा मांजरेकर (Medha Manjarekar) यादेखील प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहेत. या दोघांना सई, अश्वमी आणि सत्या या तीन मुलांव्यतिरिक्त आणखी एक लेक आहे. तिचे नाव आहे गौरी इंगवले (Gauri Ingawale). गौरीसुद्धा अभिनेत्री आहे. नुकताच तिचा पांघरूण (Pangharun) हा चित्रपट रिलीज झाला होता.
निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नी दीपा मेहता या कॉश्च्युम डिझायनर आहेत. परंतु मेधा मांजरेकर यांच्यासोबत काम केल्यावर त्यांचे एकमेकांवर प्रेम जडले. १९९५ साली महेश मांजरेकर आई हा चित्रपट बनवत होते. त्यावेळी मेधा यांच्याशी त्यांची ओळख झाली.
आपल्या या चित्रपटात मेधानेच काम करावे म्हणून त्यांनी मेधा यांना विनवणी केली. मात्र अभिनयाची कुठलीच पार्श्वभूमी नसतानाही सौंदर्यावर फिदा झालेल्या महेश मांजरेकर यांनी मेधा यांना अभिनेत्री बनवण्याचा निर्णय घेतला. मात्र मेधा यांना काही सुचत नव्हते की काय करावे. कारण मेधा यांना त्यावेळी परदेश दौरा करायचा होता तो करून आल्यावरच मी तुमच्या चित्रपटात काम करेन अशी अट मेधा यांनी घातली होती. मग इथूनच त्यांच्यातील जवळीकता वाढली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले.
महेश मांजरेकर यांना सई, अश्वामि या २ मुली आहेत तर सत्या नामक एक मुलगा. तर गौरी इंगवले ही मेधा मांजरेकर यांच्या पहिल्या नवऱ्याची लेक आहे. त्यामुळे आपल्या मुलांप्रमाणेच महेश मांजरेकर गौरीला देखील आपल्या मुलांप्रमाणेच सांभाळत आहेत.
गौरी हिने बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली आहे. अभिनेता जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या 'कुटुंब' या चित्रपटात गौरीने बालकलाकार म्हणून काम केले होते. तसेच ओवी नाटकात तिने मध्यवर्ती भूमिका केली होती. नुकताच तिचा पांघरूण हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटातील तिच्या कामाची सर्वत्र खूप प्रशंसा झाली.