De Dhakka 2 Trailer: मराठी माणसाला कमी लेखायचं नाय...! ‘दे धक्का 2’चा धम्माल ट्रेलर पाहिलात का?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 10:20 AM2022-07-21T10:20:44+5:302022-07-29T14:41:00+5:30
De Dhakka 2 Trailer: कॉमेडीच्या लाटेवर होऊन स्वार, जाधव फॅमिली निघाली साता समुद्रापार..! पाहा ट्रेलर
De Dhakka 2 Trailer: ‘दे धक्का’ (De Dhakka ) हा सिनेमा 2008 साली प्रदर्शित झाला होता आणि या सिनेमावर प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. एका क्रेझी कुटुंबाची कथा बघताना प्रेक्षक भान विसरले होते. ‘दे धक्का’ला मिळालेला हा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता, या चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टची अर्थात ‘दे धक्का 2’ची (De Dhakka 2) चर्चा सुरू झाली होती. तर आता ‘दे धक्का 2’ प्रदर्शनासाठी सज्ज आहे. येत्या 5 ऑगस्टला हा चित्रपट तुमच्या आमच्या भेटीस येतोय. त्याआधी या चित्रपटाचा अफलातून ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
‘दे धक्का 2’मध्ये सुद्धा मकरंद जाधव आणि कुटुंबीय त्यांच्या जुन्या धमाल अंदाजात पुन्हा भेटीला येणार आहेत. अर्थात यावेळी जरा वेगळा ट्विस्ट आहे. चित्रपटाची कथा दूर लंडनमध्ये घडतेय. ‘दे धक्का 2’च्या ट्रेलरमध्ये याची झलक पाहायला मिळते.
लंडनमध्ये भारतीय अॅम्बिसीडर दरवर्षी एका भारतीय उद्योगपतीचा सत्कार करतात आणि यावर्षीचा मान मकरंदला मिळतो. मग काय, अतरंगी जाधव कुटुंब राणीच्या देशात पोहोचतं. आता राणीच्या देशात आल्यावर इंग्निश तर बोलता यायला हवंच ना. इंग्लिश बोलताना सिद्धूचं अडखळणं, शिवाजी साटम यांचं पाण्यासारखं दारू पिणं या सगळ्या गोष्टी गंमत आणतात. मराठी माणूस म्हणून हिणवणाºया गोºयांना जाधव फॅमिली दरडावून एक वाक्य दरडावून सांगते. ते म्हणजे, मराठी माणसाला कधी कमी लेखायचं नाय...! जाधव कुटुंबिय राणीच्या देशात मज्जा मस्तीच्या मूडमध्ये असताना त्यांच्यावर एक नवं संकट कोसळतं. आता या संकटातून जाधव फॅमिली कशी बाहेर येते आणि संकटाला दे धक्का म्हणत कशी पुढे जाते ते चित्रपटात दिसणार आहे.
‘दे धक्का’मध्ये धनाजीने आणलेली टमटम लक्षवेधी ठरली होती. यावेळी पण हे कुटुंबीय अशाच गाडीतून फिरताना दिसणार असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे. एकूणच मकरंद जाधव आणि त्याची बायको सुमती, मुलगी सायली, मुलगा किस्ना, अतरंगी जावई धनाजी, हेमल्या आणि तात्यांची धम्माल या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. महेश मांजरेकर सुद्धा सिनेमात एका भूमिकेत दिसून येणार आहेत.सध्या ‘दे धक्का 2’चा ट्रेलर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.