Daagdi Chaawl 2 Teaser : दगडी चाळीचा रॉबिन हूड... ही इज बॅक ...! ‘दगडी चाळ 2’चा टीझर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 11:32 AM2022-06-20T11:32:17+5:302022-06-20T11:41:33+5:30

Daagdi Chaawl 2 Teaser : होय, ‘दगडी चाळ’चा सीक्वल अर्थात ‘दगडी चाळ 2’ (Daagdi Chaawl 2 ) हा सिनेमा लवकरच तुमच्या भेटीस येतोय.

makarand deshpande starrer marathi movie daagdi chaawl 2 teaser release | Daagdi Chaawl 2 Teaser : दगडी चाळीचा रॉबिन हूड... ही इज बॅक ...! ‘दगडी चाळ 2’चा टीझर रिलीज

Daagdi Chaawl 2 Teaser : दगडी चाळीचा रॉबिन हूड... ही इज बॅक ...! ‘दगडी चाळ 2’चा टीझर रिलीज

googlenewsNext

Daagdi Chaawl 2 Teaser :  2015 साली  ‘दगडी चाळ 2’  हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. पूजा सावंत, अंकुश चौधरी, मकरंद देशपांडे यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा प्रचंड गाजला होता. या चित्रपटातील डॅडी हे वास्तविक पात्र असलं तरी कथा काल्पनिक होती. लोकांनी ती अक्षरश: डोक्यावर घेतली होती. मकरंद देशपांडे (Makarand Deshpande) यांनी साकारलेली डॅडीची भूमिका आणि त्याचा दरारा पाहून सगळेच थक्क झाले होते. आता डॅडीचा हा दरारा पुन्हा अनुभवता येणार आहे. होय, ‘दगडी चाळ’चा सीक्वल अर्थात ‘दगडी चाळ 2’  (Daagdi Chaawl 2 ) हा सिनेमा लवकरच तुमच्या भेटीस येतोय. सध्या या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे आणि तो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

डोक्यावर गांधी टोपी, पांढरा शुभ्र शर्ट पायजमा, झुपकेदार मिशा, नजरेत आगीच्या ज्वाला, काटक शरीरयष्टी... गँगवारच्या इतिहासातील एक महत्त्वाचे नाव दगडी चाळीचा रॉबिन हूड, म्हणजेच अरूण गुलाब गवळी उर्फ डॅडी..., ही इज बॅक.., असं म्हणत या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.

‘दगडी चाळ 2’च्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. येत्या 18 ऑगस्टला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित हा चित्रपट चंद्रकांत कणसे यांनी दिग्दर्शित केला आहे.संगीता अहिर यांनी यापूर्वी चित्रपटसृष्टीला अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. बॉलिवूडमध्ये निर्माती म्हणून नावलौकिक मिळवल्यानंतर संगीता अहिर यांनी ‘दगडी चाळ’च्या निमित्ताने मराठी चित्रपटांच्या निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता त्या ‘दगडी चाळ’चा सीक्वल घेऊन सज्ज झाल्या आहेत. 

दुस-या भागाची कथादेखील डॅडीभोवती फिरणार असून कथा काल्पनिक असणार आहे. या चित्रपटात काय नवीन पाहायला मिळणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेच.

Web Title: makarand deshpande starrer marathi movie daagdi chaawl 2 teaser release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.