मेकअप मॅन बनला मराठी चित्रपटाचा निमार्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2016 12:17 PM2016-05-18T12:17:44+5:302016-05-18T17:47:44+5:30
चहावाला पंतप्रधान, भेळवाला उदयोगपती अशा जीवनाला नवीन रस्ता दाखविणारे व संघर्षाला बळ देणारे किस्से आपण नेहमीच ऐकतो. असेच एक ...
च ावाला पंतप्रधान, भेळवाला उदयोगपती अशा जीवनाला नवीन रस्ता दाखविणारे व संघर्षाला बळ देणारे किस्से आपण नेहमीच ऐकतो. असेच एक प्रोत्साहन देणारे उदाहरण सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये फिरत आहे. २० मे रोजी प्रदर्शित होणारा पैसा पैसा या चित्रपटाचे निर्माते शिवविलाश चौरसिया यांचा खडतर प्रवास हा देखील खरचं एखादयाला जगण्याची उमेद दाखविणारा आहे. शिवविलाश हे अंधेरीच्या रस्त्यांवर हातात कधी भाजी, कोथिंबीर, सणवारांना लागणाºया गोष्टी घेऊन तर कधी दुकानदारांना किटलीतून चहा विकणारे होते. वडील देखील लहान वयातच सोडून गेले. अशातच एका चहाटपरी वाल्याने गावी जायचे असल्याने पाचशे रुपये डिपॉजीट घेऊन आपली चहाटपरी शिवविलाश यांना चालवायला दिली. दुकानदारांना चहा पोहोचवता एकदा अंधेरीला सुरू असलेल्या हिंदी मालिकेच्या शुटींग सेटवर चहा देण्याचे काम त्यांना मिळाले. कलाकारांना मेकअप करताना पाहण्यात चहा द्यायला आलेला शिवविलाश मग्न होत असे. मेकअपमन दिलीप नायक यांनी एकदा त्यांना हटकलं. त्यावर मुझे ये काम सिखना हैे असं म्हणून निघून जाताना दिलीप नायक यांनी स्वत:चं व्हीजीटींग कार्ड शिवविलाश यांच्या हातात दिलं. त्या दिवसापासून ते दोन महिन्यांपर्यंत शिवविलाश नायक यांना नजिकच्या पीसीओ वरून रोज फोन लावत असे. पण, उत्तर मिळत नव्हतं. शेवटी कंटाळून शिवविलाश यांनी फोन करणं थांबवलं आणि त्याच दिवशी नायक यांचा त्या पीसीओवर फोन आला, आणि त्यांनी विचारले, आज फोन क्युं नहीं किया?त्यावर भूल गयो असं उत्तर देऊन फोन ठेवणार इतक्यात नायक यांनी कल मिलने को आ असा आदेश दिला. आणि तिथून त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. आज हाच मेकअप मॅन हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील आघाडीचा मेकअप आर्टीस्ट आहे. जस्सी जैसी कोई नही पासुन सुरू झालेला त्यांचा प्रवास इंडीयन आयडल, नच बलिए, डान्स इंडीया डान्स, झलक दिखलाजा पर्यंत सुरू आहे. गायक-संगीतकार विशाल दादलानी, फरीदा जलाल, अली अजगर, आलोकनाथ आणि अनेक दिग्गज कलाकारांचा तो स्पेशल मेकअपमन आहे.आणि त्याहीपलीकडे जाऊन आज हा माणूस मराठी इंडस्ट्रीचा निर्माता बनला आहे.