मकरंद देशपांडे आणि सुखदा एकत्रित
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2016 04:36 PM2016-11-27T16:36:17+5:302016-11-27T17:04:15+5:30
सध्या मराठी इंडस्ट्री नाटकांच्या प्रेमात पडलेली दिसत आहे. चित्रपटांप्रमाणेच नाटकांचेदेखील प्रमाण वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे बरेच कलाकारदेखील ...
स ्या मराठी इंडस्ट्री नाटकांच्या प्रेमात पडलेली दिसत आहे. चित्रपटांप्रमाणेच नाटकांचेदेखील प्रमाण वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे बरेच कलाकारदेखील चित्रपटांप्रमाणेच नाटकांवरदेखील प्रेम करू लागले आहे. आता हेच पाहा ना, प्रेक्षकांचा लाडका अभिनेता मकरंद देशपांडे यांचे देखील नवीन नाटक आहे. या नाटकाचे नाव शेक्सपिअरचा म्हातारा असे आहे. हे नाटक नुकतचं पृथ्वी फे स्टीव्हलला प्रदर्शित करण्यात आले आहे. या नाटकामध्ये मकरंद देशपांडे आणि सुखदा खांडकेकर हे कलाकार प्रेक्षकांना एकत्रित पाहायला मिळत आहे. हे त्यांचे पहिलेच मराठी नाटक असल्याचे सुखदाने लोकमत सीएनएक्सला सांगितले. सुखदा सांगते, या नाटकासाठी मला ज्यावेळी विचारण्यात आले होते. त्यावेळी मी खूपच आनंदी झाले होते. पण जेव्हा मकरंद यांनी सांगितले या नाटकामध्ये माझ्या मुलीचा अभिनय करायचा त्यावेळी तर माझा आनंद व्दिगुणीत झाला होता. त्यांची काम करण्याची पद्धत खूपच छान आहे. त्यांच्यासोबत काम करण्यास खूप मजा आली. त्यांनी कलाकारांना मोकळे सोडले आहे त्यामुळे आम्ही नाटकाशी अधिक बांधलो गेलो आहोत. त्याचबरोबर नाटकाची तालीम करतानाही त्यांच्याकडून लहान गोष्टी शिकण्यास मिळाल्या आहेत. या नाटकदरम्यान पुन्हा एन्जॉय करणं हे नव्याने शिकले आहे. हे माझे दुसरे मराठी नाटक असल्यामुळे खरचं खूप छान वाटले. त्याचबरोबर या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मकरंद यांचा अभिनय, लिखाण, दिग्दर्शन असा ट्रिपल धमाका पाहायला मिळणार आहे. या नाटकात माझ्यासोबत रोहित हळदीकर, आकांक्षा गाडे, रेशम प्रशांत, आरती मोरे, माधुरी गवळी आदि कलाकारांचा समावेश आहे. मकरंदने यापूर्वी बॉलिवुड व मराठी चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. तर सुखदा ही प्रेक्षकांना बाजीराव मस्तानी या चित्रपटात पाहायला मिळाली.