मकरंद देशपांडेची पत्नी आहे खूपच ग्लॅमरस, ती आहे या मराठी अभिनेत्रीची सख्खी बहिण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 08:00 AM2022-03-08T08:00:00+5:302022-03-08T08:00:00+5:30
मकरंद देशपांडे (Makrand Deshpande) यांच्या पत्नीबद्दल फारसे कोणाला माहित नाही.
सरफरोश, स्वदेस, कायमत से कायमत तक, प्रहार, फरेब , मकडी, डरना जरुरी है, दगडी चाळ या आणि अशा अनेक मराठी हिंदी चित्रपटात अभिनेता मकरंद देशपांडे (Makrand Deshpande) यांनी आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात घर केले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून मकरंद देशपांडे पृथ्वी थिएटर्सशी जोडले गेले आहेत. त्यातून त्यांनी अनेक दर्जेदार नाटकांचे अभिनयासोबत दिग्दर्शनही केले आहे. मकरंद देशपांडे यांच्या खासगी आयुष्याबद्दल फारसे कोणाला माहित नाही.
मकरंद देशपांडे हे निवेदिता पोहनकर (Nivedita Pohankar)सोबत सात वर्षे लिव्ह इन रिलेशनववरून चर्चेत राहिले होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. निवेदिता पोहनकर ही लेखिका म्हणून ओळखली जाते. पृथ्वी थिएटर्सची काही नाटके तिने लिहिली आहेत. रंगभूमीवर काम करत असतानाचा निवेदिता आणि मकरंद यांची भेट झाल्याचे म्हटले जाते.
निवेदिता पोहनकर ही मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री अदिती पोहनकर (Aditi Pohankar) हिची धाकटी बहीण आहे. २०१४ साली रितेश देशमुखच्या लय भारी या गाजलेल्या चित्रपटात अदितीने नंदिनीचे पात्र साकारले होते. या चित्रपटामुळे अदितीला चांगली लोकप्रियता मिळाली होती. अदितीने आपल्या करिअरची सुरुवात रंगभूमीपासून केली होती. सुरुवातीला ती देखील पृथ्वी थिएटर्सशी जोडली गेली होती. लव्ह सेक्स और धोका या हिंदी चित्रपटातून अदिती पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर झळकली. हिंदी चित्रपटातून प्रसिद्धी मिळवल्यानंतर अदितीने कुणासाठी कुणीतरी या चित्रपटातून मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. शी आणि आश्रम या आणखी दोन हिंदी वेबसीरिजमध्ये अदिती झळकली आहे. यातील तिच्या कामाचे खूप कौतुक झाले.
अभिनयासोबतच अदितीने मॉडेल म्हणून २०१४ मध्ये काम केले आहे कॅडबरी फोरम, गोदरेज, एअरटेल यासारख्या जाहिरातीतून तिला झळकण्याची संधी मिळत गेली. निवेदिता आणि अदिती यांची आई शोभा पोहनकर या राष्ट्रीय स्तरावरील हॉकी प्लेअर म्हणून ओळखल्या जातात तर त्यांचे वडील सुधीर पोहनकर हे मॅरेथॉन चॅम्पियन ठरले होते.