"पुणेरी मुली सुंदर..." मानसी नाईकच्या कॅप्शनने वेधलं लक्ष; काही महिन्यांपूर्वीच झाला घटस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 14:48 IST2023-05-01T14:47:46+5:302023-05-01T14:48:31+5:30
मानसीने काही तासांपूर्वीच ब्लॅक आणि गोल्डन रंगाच्या ड्रेसमध्ये काही फोटो शेअर केलेत.

"पुणेरी मुली सुंदर..." मानसी नाईकच्या कॅप्शनने वेधलं लक्ष; काही महिन्यांपूर्वीच झाला घटस्फोट
मराठी अभिनेत्री मानसी नाईकची (Manasi Naik) सध्या कलाविश्वात भलतीच चर्चा आहे. आधी घटस्फोट आणि नंतर नवीन घरात प्रवेश या कारणाने ती सध्या चर्चेत असते. मानसी आपले अनेक फोटो पोस्ट करत असून त्या फोटोंखालचे कॅप्शन लक्ष वेधून घेणारे असते. मानसी आता तिच्या घटस्फोटानंतर सावरत आहे आणि आयुष्याकडे नव्या दृष्टिकोनातून बघण्याचा प्रयत्न करत आहे हेच वेळोवेळी तिच्या कॅप्शनमधून समजते.
मानसीने काही तासांपूर्वीच ब्लॅक आणि गोल्डन रंगाच्या ड्रेसमध्ये काही फोटो शेअर केलेत. त्यावर मोठे कानातले घातले असून मेकअप केला आहे. या लुकमध्ये मानसी नेहमीसारखीच सुंदर दिसत आहे. तिच्या नवीन घरातच तिने हे फोटोशूट केले आहे. फोटो तर छान आहेतच पण तिने याला भन्नाट कॅप्शन दिलंय. "पुणेरी मुली सुंदर दिसतात बरंका! उदाहरणार्थ : मानसी नाईक"
दरम्यान, मध्यंतरी अभिनेत्री मानसी नाईक तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत आली आहे. गेल्या वर्षी मानसीने बॉक्सर प्रदीप खरेराशी (Pradip Kharera) लग्न केलं होतं. मात्र काही महिन्यांपूर्वीच त्यांचा घटस्फोट झाला. परंतु, आता मानसी तिच्या वैयक्तिक आयुष्यात पुढे गेली असून तिने नुकतेच नवीन घर खरेदी केले आहे. काल अक्षय तृतियेच्या मुहुर्तावर मानसीने नवीन घरात प्रवेश केला.