मानसी नाईकचा होणारा पती प्रेमाने तिला मारतो ही हाक; म्हणतोय... आयुष्यभर देणार तुला साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 11:46 AM2020-12-22T11:46:21+5:302020-12-22T11:48:46+5:30

मानसी नाईक १९ जानेवारीला लग्न करणार आहे. तिनेच सोशल मीडियाद्वारे ही गोष्ट तिच्या चाहत्यांना सांगितले आहे.

Manasi Naik will marry with boyfriend pardeep kharera on 19th January 2021 | मानसी नाईकचा होणारा पती प्रेमाने तिला मारतो ही हाक; म्हणतोय... आयुष्यभर देणार तुला साथ

मानसी नाईकचा होणारा पती प्रेमाने तिला मारतो ही हाक; म्हणतोय... आयुष्यभर देणार तुला साथ

googlenewsNext
ठळक मुद्देप्रदीपने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, माझी लाडो राणी तू माझ्या आयुष्यात आल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. आयुष्यातील प्रत्येक क्षणी मी तुला साथ देईन...

बघतोय रिक्षावाला आणि बाई वाड्यावर यांसारख्या मराठी गाण्यांवर थिरकायला भाग पाडणारी अभिनेत्री मानसी नाईक काही महिन्यांपूर्वी एन्गेज्ड झाली. बायॅफ्रेन्ड प्रदीप खरेरासोबत तिने साखरपुडा उरकला. मानसीने सोशल मीडियावर ही आनंदीची बातमी शेअर केली होती. ‘Engaged Future Mrs. Kharera’ असे म्हणत साखरपुड्याचे काही फोटो मानसीने पोस्ट केले होते. तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. आता मानसीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्या लग्नाच्या तारखेविषयी तिच्या चाहत्यांना सांगितले आहे.

मानसी नाईक १९ जानेवारीला लग्न करणार आहे. तिनेच सोशल मीडियाद्वारे ही गोष्ट तिच्या चाहत्यांना सांगितले आहे. मानसीच्या लग्नाची तारीख कळताच तिच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. ते सोशल मीडियाद्वारे तिला शुभेच्छा देत आहेत. पण या पोस्टवरील एक कमेंट सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. ही कमेंट दुसरी कोणाची नसून प्रदीप खरेराची आहे. प्रदीपने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, माझी लाडो राणी तू माझ्या आयुष्यात आल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. आयुष्यातील प्रत्येक क्षणी मी तुला साथ देईन...

मानसीचा भावी पती हा इंटरनॅशनल बॉक्सर आहे. त्यासोबतच तो अभिनेता आणि मॉडेल आहे. प्रदीप त्याच्या सोशल मीडियावर नेहमीच त्याचे फोटो पोस्ट करत असतो. तो इन्स्टाग्रामवर नेहमीच सक्रिय असतो. त्याला इन्स्टाग्रामवर पाच लाखांहून अधिक जण फॉलो करतात. प्रदीपच्या लूक्सवर त्याचे चाहते चांगलेच फिदा आहेत. मानसी ही उत्तम डान्सर असून ढोलकीच्या तालावर, हॅलो बोल, मराठी तारका यांसारख्या अनेक मराठी रिअ‍ॅलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून तिने आपल्या डान्सचे जलवे दाखवले आहेत. याशिवाय रुपेरी पडद्यावरही मानसीने आपल्या अभिनयाद्वारे रसिकांची मनं जिंकली आहेत. एकता - एक पॉवर, कुटुंब, तीन बायका फजिती ऐका, जबरदस्त, मर्डर मेस्त्री, ढोलकी, हू तू तू, कोकणस्थ यांसारख्या चित्रपटांमध्ये मानसीने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. 

 

 

Web Title: Manasi Naik will marry with boyfriend pardeep kharera on 19th January 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.