सौभाग्यवती भव, कपाळाला टिकली अन्...; घटस्फोस्टित मानसी नाईकने कोणासाठी केला शृंगार? करवाचौथचा व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 18:07 IST2023-10-31T18:02:57+5:302023-10-31T18:07:01+5:30
मानसी नाईकचा काही महिन्याआधीच घटस्फोट झाला होता. मग ती कोणासाठी करवाचौथ साजरी करतेय?, असा प्रश्न मानसीचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना प्रश्न पडलाय.

सौभाग्यवती भव, कपाळाला टिकली अन्...; घटस्फोस्टित मानसी नाईकने कोणासाठी केला शृंगार? करवाचौथचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्रात ज्याप्रमाणे वटपौर्णिमा हा सण थाटात साजरा केला जातो, त्याप्रमाणे उत्तर भारतामध्ये करवा चौथला महत्त्व आहे. बॉलिवूड आणि करवा चौथचं खास नातं आहे. आजपर्यंत अनेक चित्रपटांत करवा चौथ हा सण दाखवण्यात आला आहे. मोठ्या थाटामाटात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी करवा चौथचा सण साजरा करतात. मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईकने देखील करवाचौथच्या शुभेच्छा दिल्यात. मानसी नाईकचा काही महिन्याआधीच घटस्फोट झाला होता. मग ती कोणासाठी करवाचौथ साजरी करतेय?, असा प्रश्न मानसीचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना प्रश्न पडलाय.
मानसी नाईक सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आपले फोटो आणि रील्स मानसी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. मानसीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती करवाचौथसाठी तयार झालेली दिसतेय. सदासौभाग्यवती भव: असं लिहिलेली ओढणी तिनं डोक्यावर घेतलीये.
हा व्हिडीओ शेअर करताना मानसीने कॅप्शनमध्ये, ''हॅप्पी करवाचौथ. वेडे होऊन आणि मनापासून प्रेम करणाऱ्या सगळ्यांना करवाचौथच्या शुभेच्छा”, असं लिहिले आहे. बात अगर मोहब्बत की है तो जज़्बा बराबरी का होगा जो तुमने कुछ नहीं खाया सुबह से तो चांद भी तुम्हारा भूखा होगा ! अशी शायरी देखील मानसीनं शेअर केली आहे.
मानसीने प्रदीप खरेराशी १९ जानेवारी २०२१मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्याआधी ते एकमेकांना डेट करत होते. परंतु, लग्नानंतर त्यांच्यात खटके उडाल्याने घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. 'गुलाबी नोट', 'बाई वाड्यावर या', 'मस्त चाललंय आमचं' या गाण्यांमुळे मानसीला लोकप्रियता मिळाली. मानसीने अनेक चित्रपटांतही काम केलं आहे.