मराठी कलाकारांची महाराष्ट्र दिनानिमित्त व्हिडिओतून मानवंदना, पहा त्याची झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 06:00 IST2020-05-01T06:00:00+5:302020-05-01T06:00:00+5:30
महाराष्ट्र दिनानिमित्त मराठी कलाकारांनी वैभव महाराष्ट्राचं या व्हिडिओतून मानवंदना वाहिली आहे.

मराठी कलाकारांची महाराष्ट्र दिनानिमित्त व्हिडिओतून मानवंदना, पहा त्याची झलक
महाराष्ट्र दिनानिमित्त मराठी कलाकारांनी वैभव महाराष्ट्राचं या व्हिडिओतून मानवंदना वाहिली आहे. लॉकडाऊन असतानाही आपल्या घरात राहून व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्राला मानाचा मुजरा केला आहे. या व्हिडिओसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हेलोने स्वरूप स्टुडियो आणि चलचित्र कंपनीसोबत भागीदारी केली आहे. या व्हिडिओची झलक रिलीज करण्यात आली असून आज हा व्हिडिओ प्रदर्शित करण्यात येणार आहे.
याबद्दल सोनाली कुलकर्णी म्हणाली, “महाराष्ट्राच्या भव्यतेला मानाचा मुजरा देणे आणि तो साजरा करण्यासाठी या एकत्रीकरणाचा भाग मी असल्याचा मला फार आनंद आहे. जरी एक गाणे चित्रीत करण्यासाठी आणि न्याय करण्यासाठी पुरेसे नाही, तरीसुद्धा, आपल्या मातृभुमीला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या लॉकडाउन मध्ये आपण एकत्र येत आहोत (सर्वजण आपापल्या घरून). हा इतिहास आहे, संस्कृती आहे,वारसा आहे आणि आपला खजिना आहे."
दिग्दर्शक हेमंत ढोमे (चलचित्रचे मालक) म्हणाले, "चलचित्र कंपनीमध्ये आम्ही नेहमीच अभिमान, धैर्य आणि शौर्याने लोकांना एकत्रित ठेवण्यावर विश्वास ठेवला आहे - जे मराठ्यांचे मत आहे. तोच उत्साह ठेवून, आम्ही हेलो सोबत एकत्र येऊन आणि #वैभव महाराष्ट्राचं ची सुरूवात करून आनंदी आहोत. सांस्कृतिक विविधता आणि आपल्या श्रद्धेला रुजवून ठेवण्यासाठी आमचे राज्य आणि त्यामधील लोक यांचे आभार मानण्यासाठी हा व्हीडियो आहे. हेलो ऍपच्या माध्यमातुन मराठी बोलणारे प्रेक्षकांमध्ये आमच्या आवडत्या यूजरसाठी सकारात्मकता निर्माण करणे आणि हा दिवस अविस्मरणीय बनवणे हा आमचा उद्देश्य आहे."