मंगेश बोरगावकरची 'बावरी साद'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2017 01:03 PM2017-02-06T13:03:46+5:302017-02-06T18:33:46+5:30

नव्या पिढीच्या संगीतकार, गायकांना हक्काचं व्यासपीठ देण्यासाठी युवती म्युझिक' कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. 'बावरी साद' या गाण्याद्वारे ही कंपनी ...

Mangesh Borgaonkar's 'Bawari Saad' | मंगेश बोरगावकरची 'बावरी साद'

मंगेश बोरगावकरची 'बावरी साद'

googlenewsNext
्या पिढीच्या संगीतकार, गायकांना हक्काचं व्यासपीठ देण्यासाठी युवती म्युझिक' कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. 'बावरी साद' या गाण्याद्वारे
ही कंपनी संगीत क्षेत्रात पदार्पण करत असून, त्यांचा हा पहिला वहिला म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित झाला आहे.गेल्या काही काळात मराठी गाण्यांची लोकप्रियता सातत्याने वाढते आहे. मात्र, यातील बहुतांश गाणी चित्रपटातील आहेत. म्युझिक व्हिडिओ, अल्बमच्या निर्मितीचे प्रमाण पूर्णत: घटले आहे. निर्मितीचा खर्च अवाढव्य झाला असताना रसिक मात्र सीडी खरेदी करण्याऐवजी डाऊनलोड करण्याला प्राधान्य देत आहेत. असे असताना या काळात केवळ उत्तम गाणी, संगीत निर्मिती आणि तरूण कलाकारांना डोळ्यासमोर ठेवून प्रमोद वाघमारे यांनी 'युवती म्युझिक'ची स्थापना केली आहे.

        आताच्या काळात त्यांचा हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे. नव्या पिढीच्या नव्या जाणिवांचं संगीत रसिकांपुढे आणण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. 'बावरी साद' या प्रेम गीतातून एक कथा उलगडणार आहे. शिक्षणासाठी परदेशी जाणारी एक मुलगी आणि तिचा प्रियकर यांच्यातील हळुवार नात्याचा वेध घेण्यात आला आहे. परदेशी जाण्याच्या विचाराने होणाºया विरहानं ती मुलगी सैरभैर झाली आहे. त्या दोघांमधील नात्याचं काय होतं याचं चित्रण हाम्युझिक व्हिडिओ करतो. शलाका देशपांडे यांनी लिहिलेल्या या गाण्याला नीतेश मोरे यांनी संगीतबद्ध केलं आहे. या गाण्यातून नव्या दमाचे गीतकार आणि संगीतकार रसिकांपुढे येत आहेत. म्युझिक व्हिडिओचं दिग्दर्शन रिशव अगरवाल, चित्रीकरण मयुर बराधे यांनी केलं आहे. आताचे आघाडीचे गायक मंगेश बोरगावकर, कीर्ती किल्लेदार यांनी हे गाणं गायलं आहे. वेगळ्या स्टाईलचं हे प्रेमगीत तरुणांमध्ये धडधड वाढवणारं असून 'युवती म्युझिक'च्या नावाला साजेसं ठरलं आहे.

Web Title: Mangesh Borgaonkar's 'Bawari Saad'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.