"हा तुझा पहिला सिनेमा असूच शकत नाही", आदिनाथ कोठारेचा 'पाणी' पाहून भारावली मंजिरी ओक, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2024 03:35 PM2024-12-08T15:35:19+5:302024-12-08T15:36:01+5:30
आदिनाथ कोठारेचा पाणी सिनेमा पाहून भारावली मंजिरी ओक, म्हणते- "एकच सांगते ज्या क्षणी..."
आदिनाथ कोठारेचं दिग्दर्शन असलेला 'पाणी' सिनेमा काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. मराठवाड्यातील गावात पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या हनुमंत केंद्रे यांच्या संघर्षाची कहाणी यातून मांडण्यात आली आहे. या सिनेमात मुख्य भूमिका साकारण्याबरोबरच आदिनाथने पाणी चित्रपटातून दिग्दर्शनात पाऊल ठेवलं. नुकतंच प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओकने 'पाणी' सिनेमा पाहिला.
'पाणी' सिनेमा पाहिल्यानंतर मंजिरी भारावून गेली आहे. हा सिनेमा पाहिल्यानंतर तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने आदिनाथ कोठारेचं कौतुक केलं आहे.
मंजिरी ओकची पोस्ट
सगळयात आधी मला ही फिल्म बघायला उशीर झाला त्यासाठी आदिनाथ खूप सॉरी...🙏🏽
आदिनाथ काय बोलू ? ही तुझी पहिली फिल्म कशी असू शकते ? तू खोटं बोलतोयस 😀
अप्रतिमम्मम 👏🏻👏🏻👏🏻👏🏻
फिल्म विषयी बोलयाला माझ्याकडे काही ही ही शब्द नाहीत .
एकच सांगते ज्या क्षणी नागदरवाडीत विहिरीला पाणी लागलं
त्याक्षणी माझ्या आणि मला खात्री आहे की अनेकांच्या डोळ्यातून पाणी आलं . आणि तुझ्या घेतलेल्या कष्टांचं चीज झालं .सलाम @hanumantkendre ह्यांच्या जिद्दीला कष्टांना
आणि त्यांच्या आणि सुवर्णा ताईंच्या प्रेमाला 🙏🏽🙏🏽आणि तुला खूप घट्ट मिठी आणि मनापासून धन्यवाद की ह्या विषयाची आम्हाला एक सुंदर अशी गोष्ट सांगितलीस .. तुझं खूप खूप खूप कौतुक 👏🏻👏🏻👏🏻😍😍
कृपया सगळ्यांनी #पाणी ही फिल्म नक्की बघा
दरम्यान, १८ ऑक्टोबरला 'पाणी' हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. 'पाणी'मध्ये आदिनाथसोबतच रुचा वैद्य, सुबोध भावे, रजित कपूर, किशोर कदम, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी, मोहनाबाई, श्रीपाद जोशी, विकास पांडुरंग पाटील प्रमुख भूमिकेत आहेत. नेहा बडजात्या, दिवंगत रजत बडजात्या, प्रियांका चोप्रा जोनास आणि डॉ मधु चोप्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अॅमेझॉन प्राइमवर हा सिनेमा उपलब्ध आहे.