“बॉडीगार्डचं डोकं फाटलं, माझ्या डोळ्याला...”, मानसी नाईकने सांगितला अपघाताचा धक्कादायक अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 02:31 PM2023-08-19T14:31:01+5:302023-08-19T14:34:49+5:30
“ड्रायव्हरला झोप लागल्यामुळे गाडी ट्रकमध्ये घुसली”, मानसीचा झालेला भीषण अपघात, म्हणाली, “माझ्या डोळ्याला...”
‘बाई वाड्यावर या’, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ या गाण्यांतून लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक. ऐश्वर्या रायची हमशकल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मानसीने अल्पावधीतच मराठी कलाविश्वात वेगळं स्थान निर्माण केलं. ती एक उत्तम डान्सरही आहे. मानसीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत करिअर आणि वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. यावेळी तिने तिच्या गाडीच्या भीषण अपघाताचा प्रसंगही शेअर केला.
लोकप्रिय अभिनेत्री भार्गवी चिरमुलेच्या ‘गप्पा मस्ती’ पॉडकास्टमध्ये मानसीने हजेरी लावली होती. या मुलाखतीत तिने अपघाताचा धक्कादायक अनुभव सांगितला. दोनदा भीषण अपघातातून सुखरूप वाचल्याचा खुलासाही मानसीने केला. भीषण अपघाताचा धक्कादायक अनुभव शेअर करताना मानसी म्हणाली, “माझा पहिला अपघात परळीवरुन परतताना झाला होता. त्यानंतर एक्सप्रेसवेवर माझा दुसरा अपघात झाला. यावेळी माझी संपूर्ण टीम माझ्याबरोबर होती. आम्ही इनोव्हा गाडीतून रात्रीच्या वेळी प्रवास करत होतो. ड्रायव्हरला झोप लागली आणि त्याने गाडी थेट ट्रकमध्ये घुसवली. माझ्या पुढे बॉडीगार्ड बसला होता, त्याचं डोकं फाटलं. सुदैवाने तेव्हा मी गाडीत डोळे बंद करुन बसले होते. त्यामुळे माझ्या डोळ्याला वरच्या बाजूला लागलं होतं. पण, एक्सप्रेसवेवरील सुविधांमुळे आम्हाला लगेचच वैद्यकीय मदत मिळाल्याने आम्ही वाचलो.”
गुडन्यूज! अरुण कदम झाले आजोबा, अभिनेत्याच्या लेकीने दिला बाळाला जन्म
“माझा पहिला अपघातही असाच झाला होता. या दोन्ही अपघातानंतर मी आता रात्री प्रवास करणं थांबवलं आहे. पोलिसांनी या गोष्टी खूप व्यवस्थित पद्धतीने हाताळल्यामुळे त्या प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचल्या नाहीत. यामुळे माझा देवावर खूप जास्त विश्वास बसला आहे. मी स्वामी भक्त आहे. तुळजाभवानी माझं कुलदैवत आहे. गणपती बाप्पा, तुळजाभवानी आणि स्वामी समर्थ यांना मी खूप मानते. या दोन्ही अपघातानंतर देव आपल्याला खूप संधी देतो, हे मला जाणवलं. आपल्याकडून काय सुटतंय की चुकीचा मार्ग निवडला आहे...कधी कधी चुकीचे लोक आपल्याबरोबर असतात...खूप गोष्टी आपल्याला दिसत असूनही आपण टाळतो,” असंही मानसी पुढे म्हणाली.