लग्नावरचा विश्वास उडालाय का?, असं विचारताच मानसी नाईक म्हणाली - 'भातुकलीच्या खेळामधली...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 16:00 IST2023-01-13T15:59:56+5:302023-01-13T16:00:33+5:30
Manasi Naik : मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांचे लग्न १९ जानेवारी २०२१ ला पार पडले होते. मात्र आता लवकरच ते दोघेही विभक्त होणार आहेत.

लग्नावरचा विश्वास उडालाय का?, असं विचारताच मानसी नाईक म्हणाली - 'भातुकलीच्या खेळामधली...'
मराठी अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) सतत चर्चेत येत असते. तिने काही दिवसांपूर्वीच पती प्रदीप खरेरा(Pardeep Kharera)पासून विभक्त होणार असल्याचे सांगितले. या दोघांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान आता मानसी नाईक हिने तिच्या लग्न आणि विवाहसंस्थेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. यात तिने प्रदीपवरही निशाणा साधला आहे.
अभिनेता मानसी नाईक एका मुलाखत घटस्फोटाच्या चर्चांवर मौन सोडत सांगितले की, माझ्या घटस्फोटाबद्दल सुरू असलेल्या चर्चा खऱ्या आहेत. मी खोटं बोलणार नाही. मी घटस्फोटासाठी अर्ज दिला आहे आणि यासंबंधी प्रक्रियेला आता सुरुवातही झाली आहे. मी आता या क्षणाला खूपच दुःखी आहे.एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मानसीला तुझा लग्नावरचा विश्वास उडालाय का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ती म्हणाली, माझा लग्नावरचा विश्वास अजिबात उडालेला नाही. कारण लग्न हे फारच खास असते. होमहवन, हळद, मेहंदी, सप्तपदी याला काही तरी अर्थ आहे. जे लोक या अर्थाचा अनर्थ करतात, त्यांनी हा विचार करावा.
मात्र मानसी नाईक कधीही लग्न किंवा विवाहसंस्था या पद्धतीला विरोध करणार नाही. तशी वेळही आणून देणार नाही. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि एक राणी… हे असतं. त्यामुळे माझा लग्नावरचा विश्वास उडालेला नाही. तो उडू देखील नये. कारण आपण सर्व केलंय. मी समाजात अगदी नजरेत नजर घालून जगून शकतो. विचार त्यांनी करावा ज्यांनी खूप काही केले आहे, असा टोलाही मानसीने यावेळी लगावला. मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांचे लग्न १९ जानेवारी २०२१ ला पार पडले होते. त्याआधी काही काळ ते दोघे रिलेशनशीपमध्ये होते. मात्र आता लवकरच ते दोघेही विभक्त होणार आहेत.