मानसी नाईकचा नवरा प्रदीप खरेरा म्हणतोय 'मेरा दर्द ना जाने कोई...', पहा हा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 01:46 PM2021-02-11T13:46:55+5:302021-02-11T13:47:24+5:30

मानसी नाईक नुकतीच बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत लग्नबेडीत अडकली आहे.

Mansi Naik's husband Pradip Kharera says 'No one knows my pain ...', watch this video | मानसी नाईकचा नवरा प्रदीप खरेरा म्हणतोय 'मेरा दर्द ना जाने कोई...', पहा हा व्हिडीओ

मानसी नाईकचा नवरा प्रदीप खरेरा म्हणतोय 'मेरा दर्द ना जाने कोई...', पहा हा व्हिडीओ

googlenewsNext

मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक नुकतीच बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत लग्नबेडीत अडकली आहे. त्यानंतर ती सोशल मीडियावर नवऱ्यासोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. मानसीचा नवरा प्रदीप खरेरा हा इंटरनॅशनल बॉक्सर आहे. त्यासोबतच तो अभिनेता आणि मॉडेल आहे. नुकतेच त्याचे नवीन गाणे रिलीज झाले आहे.

मानसी नाईकचा नवरा प्रदीप खरेरा हा इंटरनॅशनल बॉक्सर सोबत अभिनेता आणि मॉडेल आहे. हे फार कमी लोकांना माहित आहे. नुकतेच त्याचे नवीन गाणे रिलीज झाले आहे. मेरा दर्द ना जाने कोई असे या गाण्याचे बोल आहेत. यात तो जवानाच्या भूमिकेत दिसतो आहे. हे गाणे टीप्सने रिलीज केले आहे. 

प्रदीप त्याच्या सोशल मीडियावर नेहमीच त्याचे फोटो पोस्ट करत असतो. तो इन्स्टाग्रामवर नेहमीच सक्रिय असतो. त्याला इन्स्टाग्रामवर पाच लाखांहून अधिक जण फॉलो करतात. प्रदीपच्या लूक्सवर त्याचे चाहते चांगलेच फिदा आहेत.


मानसी ही उत्तम डान्सर असून ढोलकीच्या तालावर, हॅलो बोल, मराठी तारका यांसारख्या अनेक मराठी रिअ‍ॅलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून तिने आपल्या डान्सचे जलवे दाखवले आहेत. याशिवाय रुपेरी पडद्यावरही मानसीने आपल्या अभिनयाद्वारे रसिकांची मनं जिंकली आहेत.


एकता - एक पॉवर, कुटुंब, तीन बायका फजिती ऐका, जबरदस्त, मर्डर मेस्त्री, ढोलकी, हू तू तू, कोकणस्थ यांसारख्या चित्रपटांमध्ये मानसीने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.

Web Title: Mansi Naik's husband Pradip Kharera says 'No one knows my pain ...', watch this video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.