"मॅन्युफॅक्चरिंग इंजिनीअर्स" शॉर्ट फिल्ममधून शिक्षण व्यवस्थेवर भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2017 12:34 PM2017-06-27T12:34:06+5:302017-06-27T18:04:06+5:30
आजकाल सगळीकडे शिक्षणाचा बाजार मांडलेला दिसतो. हे सत्य एक शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. "मॅन्युफॅक्चरिंग ...
आ काल सगळीकडे शिक्षणाचा बाजार मांडलेला दिसतो. हे सत्य एक शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. "मॅन्युफॅक्चरिंग इंजिनीअर्स" या शॉर्ट फिल्ममधून इंजिनिरिंगच्या शिक्षणावर भाष्य करण्यात आले आहे. आजकाल शिक्षणचा दर्जा, विद्यार्थांच्या समस्या यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी शिक्षण संस्था आपले स्वत:चे खिशे भरु पाहात आहे. शिक्षण व्यवस्थेसंदर्भातली ही परिस्थिती या शॉर्ट फिल्ममध्ये मांडली आहे. ही परिस्थिती फक्त इंजिनीअरिंग क्षेत्रात पुरती मर्यादित नसून मेडिकल आणि वाणिज्य यासारख्या क्षेत्रात सुद्धा अशीच आहे या सिस्टिम विरोधात शुभम नावाचा मुलगा या शॉर्ट फिल्ममध्ये आवाज उठवताना दिसतो. महाविद्यालय सध्या इंजिनिअर्स बनवण्याचा कारखाना झाला आहे. महाविद्यालयानी तयार केलेल्या इंजिनिअर्सना बाहेर पडल्यावर मात्र रोजगार मिळत नाही ते बेरोजगार होतात. यावर जर कोणी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर त्याचा आवाज कसा बंद करण्यात येतो हे या शॉर्ट फिल्ममध्ये दाखवण्यात आले आहे.
ही शॉर्ट फिल्म 26 मे रोजी अजय नाईक दिग्दर्शित हॉस्टेल डेस च्या सेट वर प्रथम प्रदर्शित करण्यात आली त्याचवेळेस ही फिल्म युट्यूबवर पण अपलोड केली. युट्यूबर हा फिल्म 48 तासात 5000 हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिली आहे. या फिल्मला विद्यार्थी वर्गातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.